शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएममध्ये बिघाड, खासदारांचे मतदान थांबले; ४० मिनिटं करावी लागली प्रतीक्षा
2
"भाजपासोबत सत्तेत गेल्यानंतर शरद पवार समर्थन देणार होते, 'त्या' भेटीगाठी ठरवून झाल्या"
3
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, सुखाचे प्रसंग येतील
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: दुसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या ८८ जागांवर मतदान सुरू, वर्ध्यात ईव्हीएममध्ये बिघाड
5
घराणेशाहीचा आरोप टाळण्यासाठी प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत
6
जगातील सर्वांत खर्चीक ठरणार यंदाची लोकसभा निवडणूक; अमेरिकेलाही टाकणार मागे
7
मामा असावा तर असा! ८ वर्षांचे मतभेद विसरून आरती सिंहच्या लग्नाला गेला गोविंदा, पाहा व्हिडिओ
8
उमेदवारांनो, शक्तिप्रदर्शन करताना जपून; कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा खर्चही निवडणूक खर्चात मोजणार
9
राहुल गांधी की रॉबर्ट वाड्रा हा नवा ट्विस्ट; अमेठी व रायबरेलीचा सस्पेन्स संपणार
10
इंडिया आघाडीला सपाचा पाठिंबा; उद्धवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरणार
11
साेलापूरमध्ये लढत तरुणाईची; प्रणिती शिंदे बाजी मारणार की, भाजप तिसऱ्यांदा जागा राखणार?
12
कॉन्फिडन्स होता फुल्ल, पण डिपाॅझिटच झाले गुल; ७६८ उमेदवारांना बसला फटका
13
मुस्लीम मतदारांच्या हाती या मतदारसंघाची चावी; तृणमूल काँग्रेसला माकप देणार टक्कर
14
सलमान खान गोळीबार प्रकरणी गोळीबारासाठी बंदूक पुरविणाऱ्या दोघांना अटक
15
महाराष्ट्रात निर्यातबंदी, गुजरातचा कांदा परदेशात; २००० मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याला मंजुरी
16
‘क्लीन चिट’चे दुकान! आरोप असताना निर्दोष सोडणारी तपास यंत्रणा खोटारडी?
17
पराभवाच्या भितीने घाबरलेले पंतप्रधान मोदी वाट्टेल ते खोटं नाटं बोलत आहेत; काँग्रेसची बोचरी टीका
18
“रक्षा खडसे गेल्या वेळेपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील”; नाथाभाऊंनी दिला आशिर्वाद
19
Indian team selection reports - रिषभ पंतची T20 World Cup संघात जागा पक्की! संजू पुन्हा पडला मागे, १ जागेसाठी तिरंगी लढत
20
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'त्यांचं सरकार...'

रेल्वे स्थानकात प्रवाशांची एंट्री विरुद्ध दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 10:07 PM

नागपूर- गोंदिया प्रवासा दरम्यान रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी प्रत्येक रेल्वे स्थानकावर दिसून येते. रेल्वे गाडीत लवकर चढण्याकरिता शेकडो रेल्वे प्रवाशी स्थानकाच्या विरुध्द बाजूने जीव धोक्यात घालून प्रवाशी गाडीत प्रवेश करतात. सदर मार्गावर दररोज प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. अनेक प्रवाशांना गाडीत प्रवेश करतांना तारेवरची कसरत करावी लागते. नेहमीच्या गर्दीचा सर्वात जास्त फटका प्रवाशी महिला, वृध्द तथा लहान मुलांना बसत आहे. नागपूर-गोंदिया मार्गावर शटल ट्रेन सुरु करण्याची मागणी काँग्रेसचे नेते डॉ. पंकज कारेमोरे यांनी केली आहे.

ठळक मुद्देजीव धोक्यात : शटल ट्रेन सुरू करण्याची मागणी, प्रवासी गाड्याही धावताहेत विलंबाने

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : नागपूर- गोंदिया प्रवासा दरम्यान रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी प्रत्येक रेल्वे स्थानकावर दिसून येते. रेल्वे गाडीत लवकर चढण्याकरिता शेकडो रेल्वे प्रवाशी स्थानकाच्या विरुध्द बाजूने जीव धोक्यात घालून प्रवाशी गाडीत प्रवेश करतात. सदर मार्गावर दररोज प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. अनेक प्रवाशांना गाडीत प्रवेश करतांना तारेवरची कसरत करावी लागते. नेहमीच्या गर्दीचा सर्वात जास्त फटका प्रवाशी महिला, वृध्द तथा लहान मुलांना बसत आहे. नागपूर-गोंदिया मार्गावर शटल ट्रेन सुरु करण्याची मागणी काँग्रेसचे नेते डॉ. पंकज कारेमोरे यांनी केली आहे.नागपूर, भंडारा, तुमसर, तिरोडा व गोंदिया दरम्यान दररोज शेकडो प्रवाशी ये-जा करतात. या मार्गावर प्रत्येक पॅसेंजर व एक्सप्रेस गाड्या हाऊसफुल्ल राहत असल्याने प्रवाशांचे गेल्या अनेक दिवसापासून हाल होत आहेत. प्रवाशांना रेल्वेस्थानकावरुन सहजपणे गाडीत प्रवेश करता येत नाही. त्यामुळे अनेक प्रवाशी विरुध्द बाजूने रेल्वेगाडीत प्रवेश करताना धडपड करतात. परंतु यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत असून नाईलाजने शेकडो प्रवाशी असे विरुद्ध दिशेने रेल्वेस्थानकात प्रवास करताना दिसतात.सकाळी व सायंकाळच्या वेळी या मार्गावर हजारो प्रवाशांची दैनंदिन ये जा सुरु असते. प्रवाश्यांच्या तुलनेत मार्गावर गाड्या त्या मानाने कमी आहेत. शेकडो प्रवाशांना दररोज उभ्यानेच प्रवास करावा लागतो. रेल्वे स्थानकातील गाडीत प्रवेश करणे प्रवाशांना मोठे आव्हान आहे. त्यातच महिला, वृध्द व लहान मुलांना प्रवेश करणे अत्यंत कठीण होत आहे.सदर मार्गावर रेल्वे प्रशासनाने प्रवाशी गाड्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.तुमसर- तिरोडी रेल्वे इतवारीपर्यंत जाते तशीच ती गाडी गोंदिया पर्यंत वाढविण्याची गरज बनली आहे. रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून १ जुलैपासून अनेक प्रवाशी गाड्या उशिरा सुटणार असल्याचे पत्रकच दक्षीण पूर्व रेल्वेने काढले आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते डॉ. पंकज कारेमोरे यांनी नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना प्रवाशी गाड्या वाढविणे, शटल ट्रेन सुरु करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. याकडे रेल्वे प्रशसनाने गांर्भीयाने लक्ष देण्याची गरज आहे.