आधार क्रमांक मागून ६५ हजारांनी गंडविले

By admin | Published: July 13, 2017 12:25 AM2017-07-13T00:25:26+5:302017-07-13T00:25:26+5:30

‘तुमचा एटीएम बंद होईल, त्याकरिता आधार क्रमांक तात्काळ सांगा’ असा भ्रमणध्वनीवरून संदेश आला.

65 thousand people complained against the Aadhaar numbers | आधार क्रमांक मागून ६५ हजारांनी गंडविले

आधार क्रमांक मागून ६५ हजारांनी गंडविले

Next

बचत खात्यातून काढले पैसे : पोलिसात व बँकेत फसवणुकीची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : ‘तुमचा एटीएम बंद होईल, त्याकरिता आधार क्रमांक तात्काळ सांगा’ असा भ्रमणध्वनीवरून संदेश आला. आधार क्रमांक सांगितल्यावर बचत खात्यातून सातवेळा ६५ हजार रूपयांची रक्कम काढण्यात आल्याचा प्रकार येरली येथील विनोद शालीकराम पटले यांच्यासोबत घडला. याप्रकरणी त्यांनी तुमसर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली असून स्थानिक सेंट्रल बँकेतही लेखी तक्रार दाखल केली आहे.
येरली येथील रहिवासी विनोद पटले व पत्नीच्या नावे तुमसर सेंट्रल बँकेच्या शाखेत एकत्रित खाते आहे. ८ जुलै रोजी पटले यांना दुपारी २ वाजताच्या सुमारास भ्रमणध्वनी क्रमांक ९७०९८१८७१७ वरून फोन आला. मी बँकेतून बोलत आहे, असे सांगून ‘तुमचा एटीएम बंद होईल त्याकरिता तुमचा आधार क्रमांक सांगा’ असा फोन आला. एटीएम बंद होईल, या भीतीने पटले यांनी संबंधिताला आधार क्रमांक सांगितला. त्यानंतर विनोद पटले यांच्या भ्रमणध्वनीवर ६५ हजार रूपये डेबीट झाल्याचा मॅसेज आला. १० जुलै रोजी सेंट्रल बँक आॅफ इंडिया तुमसर शाखेत पासबुकची प्रिंट केली. त्यात ६५ हजार रूपये कमी दाखविण्यात आले. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विनोद पटले यांनी तुमसर पोलीस ठाण्यात व स्थानिक सेंट्रल बँकेच्या तुमसर शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार केली. पटले हे कुक्कुटपालनाचा घरगुती व्यवसाय करतात. कॅशलेस व डिजीटल इंडियाचे स्वप्न पाहणाऱ्या या देशात ग्रामीण भागातील जनतेची अशी फसवणूक होत आहे. हा गुन्हा सायबर क्राईमच्या कक्षेत हा मोडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विनोद पटले यांची लेखी तक्रार प्राप्त झाली असून त्या अनुषंगाने बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार पाठविण्यात आली आहे. कारवाईसंदर्भात आताच काही सांगता येत नाही. देशात अशा फसवणुकीचा प्रकार सुरू असून खातेदारांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
-डी.एन. पाचपुते, व्यवस्थापक, सेंट्रल बँक, तुमसर.

Web Title: 65 thousand people complained against the Aadhaar numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.