४६ हजार हेक्टरमधील पीक धोक्यात

By admin | Published: January 16, 2017 12:22 AM2017-01-16T00:22:54+5:302017-01-16T00:22:54+5:30

वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील ४६ हजार १५७ हेक्टरमधील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

46,000 hectares of crop risk | ४६ हजार हेक्टरमधील पीक धोक्यात

४६ हजार हेक्टरमधील पीक धोक्यात

Next

फटका वातावरण बदलाचा : रबीची १०१ टक्के पेरणी
देवानंद नंदेश्वर भंडारा
वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील ४६ हजार १५७ हेक्टरमधील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०१ टक्के रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झालेली आहे.
धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाच्या लहरीपणा व किडींचा प्रभावामुळे उत्पादन घटले. खरीप हंगामात धानाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची भिस्त रबी पिकावर आहे. मात्र ढगाळ वातावरण, किडींचा प्रादूर्भाव आदी विविध कारणामुळे पीक संकटात आहेत. यावर्षीच्या रबी हंगामासाठी ४५ हजार ७५८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित केले. शेतकऱ्यांनी आतापर्यंत १०१ टक्के पेरणी पूर्ण केली आहे. ४६ हजार १५७ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी करण्यात आली. यावर्षी आजपर्यंत गहू पिकाची १०,३४५ हेक्टर क्षेत्रात गहू पिकाची लागवड करण्यात आली. हरभरा १०,११३ हेक्टर, लाख-लाखोळी ९ हजार ३९९, पोपट ७९३, वटाना ७८१, उडीद व मुंग एक हजार ९५, इतर कडधान्य ४ हजार ३२६ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकाची लागवड पूर्ण करण्यात आली.
जवस १ हजार ९९६, मोहरी ११७, तीळ २, एकूण गळीत धान्य २ हजार १५८ हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आली आहे. भाजीपाला २ हजार ५६७ हेक्टर, बटाटा ९८, मिरची ९८४ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली.
कृषी विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, भंडारा तालुक्यात रब्बी पिकासाठी ७ हजार ६५७ हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी निर्धारित करण्यात आले होते. त्यापैकी ६ हजार ५६६ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आलेली आहे. पवनी तालुक्यात ९ हजार २५७ हेक्टर निर्धारित क्षेत्रापैकी १२ हजार ६१५, मोहाडी ३ हजार ७९४ पैकी ५ हजार ६०४, तुमसर ५ हजार ४७० हेक्टर क्षेत्रापैकी ५ हजार १४५ हेक्टर क्षेत्रामध्ये रब्बी पिकाची लागवड करण्यात आली आहे. साकोली तालुक्यात ३ हजार ४१५ हेक्टर क्षेत्रापैकी ३ हजार ४०६, लाखांदूर तालुक्यात ८ हजार ४२३ हेक्टर क्षेत्रापैकी ७ हजार ५५७ हेक्टरमध्ये, लाखनी तालुक्यात ५ हजार ७४२ हेक्टर क्षेत्रापैकी ५ हजार २३६ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकाची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात मका, सुर्यफुल, करडई, या रबी पिकाची लागवड करण्यात आली नाही.

Web Title: 46,000 hectares of crop risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.