महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 06:03 AM2024-05-09T06:03:34+5:302024-05-09T06:03:42+5:30

फाडाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री १६ टक्के वाढून ३,३५,१२३ वाहनांवर गेली.

22 lakh vehicles sold in a month; 27 percent increase; Enthusiasm among buyers across the country | महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह

महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : एप्रिल २०२४ मध्ये देशातील वाहनांची किरकोळ विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत २७ टक्के वाढली. २२,०६,०७० वाहनांची विक्री या महिन्यात झाली. ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन’ने (फाडा) बुधवारी ही माहिती दिली. एप्रिल २०२३ मध्ये एकूण १७,४०,६४९ वाहनांची नोंदणी झाली होती.

फाडाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री १६ टक्के वाढून ३,३५,१२३ वाहनांवर गेली. फाडाचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी सांगितले की, प्रवासी वाहनांच्या विक्रीने २ अंकी वृद्धी मिळविली. मॉडेलांची उपलब्धता, अनुकूल बाजार धारणा, गुढीपाडव्यासारखा सण यामुळे ही वृद्धी गाठणे शक्य झाले. १,५०३ आरटीओ कार्यालयांपैकी १,३६० आरटीओ कार्यालयांतील नव्या वाहन नोंदणीच्या आकडेवारीनुसार एप्रिलमधील विक्रीचा अहवाल तयार करण्यात आला आहे.

नव्या वाहनांच्या नोंदणीचे प्रमाण वाढले
प्रकार    विक्रीची संख्या    वाढीचे प्रमाण 
दुचाकी    १६,४३,५१०        ३३%
प्रवासी    ३,३५,१२३        १६%
तीनचाकी    ८०,१०५        ९%
व्यावसायिक    ९०,७०७        २% 
ट्रॅक्टर    ५६,६२५        १%

Web Title: 22 lakh vehicles sold in a month; 27 percent increase; Enthusiasm among buyers across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार