काँग्रेसवाले संविधानाबद्दल गैरसमज पसरवतात, अकोल्यातील सभेत अमित शाह यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 07:03 PM2024-04-23T19:03:44+5:302024-04-23T19:04:29+5:30

अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते.

Congressmen spread misunderstanding about the Constitution, Amit Shah charged in the meeting in Akola | काँग्रेसवाले संविधानाबद्दल गैरसमज पसरवतात, अकोल्यातील सभेत अमित शाह यांचा आरोप

काँग्रेसवाले संविधानाबद्दल गैरसमज पसरवतात, अकोल्यातील सभेत अमित शाह यांचा आरोप

मनोज भिवगडे 

अकोला :  या देशातील जनतेने दहा वर्षांपूर्वीच भारतीय जनता पार्टीला बहुमत दिले होते. त्याचा उपयोग भाजपने कलम 370 हटविण्यासाठी, दहशतवाद संपवण्यासाठी केला. मात्र, काँग्रेसकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.

अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपेंद्र कोठेकर,  खासदार भावना गवळी,  प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आ. संजय कुटे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार  अमोल मिटकरी, माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, माजी आमदार तुकाराम बिडकर, माजी आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार बळीराम सिरस्कार, जयदीप कवाडे, नकुल देशमुख आदी उपस्थित होते. 

अकोल्यातील उन्हाचा कडाका लक्षात घेता मैदानावर नागरिकांच्या बसण्याकरिता मोठ्या डोमची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्यात महिन्यात निवडणूक घोषणा होण्यापूर्वी अमित शाह पश्चिम व पूर्व वऱ्हाडातील सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी अकोल्यात येऊन गेले होते. महिना भरात त्यांचा हा दुसरा अकोला दौरा आहे. पश्चिम बंगालमधील दोन जाहीर सभांना संबोधित करून शाह हे अकोला येथे दाखल झाले आहेत. अकोल्यातील सभा आटोपून ते बेंगरुळू येथील रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहेत. दरम्यान, त्यांच्या सभेसाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सभेपूर्वीच पावसाचे आगमन 

अमित शाह यांच्या सभेपूर्वी अकोला शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसातही सभास्थळी नागरिक उपस्थित होते. बसण्यासाठी असलेल्या खुर्च्या भर पावसात डोक्यावर घेऊन नागरिक शाह यांची प्रतीक्षा करीत सभा मंडपात उभे होते.  या पावसातही नागरिकांचा उत्साह मात्र कायम होता. 

सभेला तब्बल दोन तास उशीर 

अमित शहा यांच्या सभेचे अकोला येथे दुपारी 3.30 वाजता आयोजन करण्यात आले होते. मात्र शाह या सभेला तब्बल दोन तास उशिरा पोहचले.

Web Title: Congressmen spread misunderstanding about the Constitution, Amit Shah charged in the meeting in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.