मधमाश्यांचा हल्ला; शेतमजुराचा मृत्यू

By admin | Published: October 25, 2016 03:06 AM2016-10-25T03:06:05+5:302016-10-25T03:06:05+5:30

तेल्हारा तालुक्यातील घटना.

Bees Attack; The death of the laborer | मधमाश्यांचा हल्ला; शेतमजुराचा मृत्यू

मधमाश्यांचा हल्ला; शेतमजुराचा मृत्यू

Next

अकोला, दि. २४- तेल्हारा तालुक्यातील पारळा येथील शेतमजुरावर मधमाश्यांनी हल्ला चढविल्याने शेतमजूर गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पारळा शेतशिवारात घडली. सर्वोपचार रुग्णालयात त्याचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पारळा येथील राहणारे प्रल्हादराव डांगे(७५) हे शेतमजूर सोमवारी सकाळी वखरणीसाठी शेतात गेले होते. वखरणी करीत असताना, झाडावरील मधमाश्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. मधमाश्या चावल्यामुळे ते बैलजोडी सोडून गावाकडे पळायला लागले. ग्रामस्थांनीसुद्धा त्यांच्या अंगावरील मधमाश्यांचे काटे काढण्याचा प्रयत्न केला. ते गंभीर जखमी झाल्यामुळे ग्रामस्थांनीच त्यांना तातडीने ऑटोरिक्षामध्ये घालून सर्वोपचार रुग्णालयात भरती केले; परंतु उपचारादरम्यान सोमवारी दुपारी ३.३0 वाजता त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Bees Attack; The death of the laborer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.