वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले, वीज पडून वासराचा मृत्यू, शेती पिकांचे नुकसान

By अरुण वाघमोडे | Published: April 30, 2024 06:21 PM2024-04-30T18:21:56+5:302024-04-30T18:24:13+5:30

जवळा परिसरात सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण हाेते. सायंकाळी ५ च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

Wind blew leaves from houses, killed calf due to lightning, damaged agricultural crops | वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले, वीज पडून वासराचा मृत्यू, शेती पिकांचे नुकसान

वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले, वीज पडून वासराचा मृत्यू, शेती पिकांचे नुकसान

जवळा (जि. अहमदनगर) : जामखेड तालुक्यातील जवळा व नान्नज परिसरात सोमवारी सायंकाळी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. जवळा परिसराला वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बसला असून, घरांवरील पत्रे उडाले, तसेच वीज पडून एका वासराचा मृत्यू झाला. शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले.

जवळा परिसरात सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण हाेते. सायंकाळी ५ च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जाेरदार वादळी वाऱ्यामुळे जवळा येथील सीना नदीच्या परिसरातील रामकिसन रामचंद्र भोगे यांच्या घरावरील पत्रे वाऱ्यासाेबत उडून गेले. त्यामुळे संसाराेपयाेगी साहित्य पावसाच्या पाण्यात भिजले, तसेच हनुमंत सदाशिव वाळुंजकर यांच्या वासरावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला. सोबतच शेतशिवारातील ज्वारी, कडब्यासह आंबा, चिकू, आदी पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. तर आंब्यांचा मोहर, कैऱ्या वाऱ्याने गळून पडल्या.

Web Title: Wind blew leaves from houses, killed calf due to lightning, damaged agricultural crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.