वांग्याच्या शेतात गांजाची फुलली शेती

By admin | Published: March 24, 2017 06:03 PM2017-03-24T18:03:13+5:302017-03-24T18:03:13+5:30

वांग्याच्या शेतात गांजाची शेती फुलल्याचा प्रकार उघडकीस आला़

Farmer's farm is full of heifer | वांग्याच्या शेतात गांजाची फुलली शेती

वांग्याच्या शेतात गांजाची फुलली शेती

Next
आॅनलाईन लोकमत

कर्जत : वांग्याच्या शेतात गांजाची शेती फुलल्याचा प्रकार राशीन नजीक देशमुखवाडी शिवारात उघडकीस आला़ या प्रकरणी कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित शेतकरी फरार झाला आहे.

कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला़ राशीन जवळील देशमुखवाडी शिवारात वांग्याच्या शेतात गांजाची झाडे लावलेली होती़ उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी पोलीस पथकासह  देशमुखवाडी शिवारात बरबडे वस्ती जवळील  ईश्वर ज्ञानदेव बरबडे यांच्या शेतात छापा टाकला असता वांग्याच्या शेतात गांजाची झाडे लावली असल्याचे आढळून आले. या  ठिकाणचा पंचनामा करून त्यांनी तीन झाडे जप्त करून ताब्यात घेतली. या प्रकरणी कर्जत पोलिसात अमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव महांगरे हे करत आहेत. देशमुखवाडी शिवारात टाकलेल्या या छाप्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश जाधव, पोलीस नाईक भरत गडकर, पोलीस काँन्स्टेबल शेखर डोमाळे, मच्छिंद्र जाधव, इरफान शेख आदी सहभागी झाले होते. या प्रकरणी शेतकरी ईश्वर ज्ञानदेव बरबडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरारी आहे. 

 

Web Title: Farmer's farm is full of heifer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.