सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 03:29 AM2018-08-23T03:29:45+5:302018-08-23T03:30:08+5:30

नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठानच्या वतीने सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले

Sanitation campaign on Sinhagarh fort | सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान

सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान

Next

दिघी : छत्रपती शिवाजीमहाराज यांनी स्वराज्य निर्माण केले ते सह्याद्रीच्या या गिरिदुर्ग वर. मात्र यातील काही गडकोटांची अवस्था बिकट झाली आहे. या किल्ल्यांची स्वच्छता, साफसफाई करून गड संवर्धनाचे कार्य करणाऱ्या सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठानच्या वतीने सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठानच्या वतीने सिंहगडाची स्वच्छता मोहीम राबवली. या स्वच्छता मोहिमेत २३ जणांनी सहभाग घेतला होता. यामध्ये सर्व गोळे यांच्या पिढ्या सहभागी झाले होते. पुणे दरवाजा ते नरवीर तानाजी मालुसरे समाधीस्थळपर्यंत रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला. सिंहगडाची वाट चढताना मध्ये पडलेले मोठे दगड बाजूला करण्यात आले. एकत्र केलेला प्लॅस्टिक कचरा थैलीत भरून पायथ्याशी आणला आणि टेम्पोमधून नेऊन त्याची रीतसर विल्हेवाट लावली. यानंतर ही स्वच्छता मोहीम दुसºया गडांवर राबविण्यात येणार आहे. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुती गोळे, स्वप्निल गोळे, हेमंत गोळे, अतुल गोळे, रविभाऊ गोळे, लौकिक गोळे, राकेश गोळे, संदीप गोळे, विकास गोळे, नितीन गोळे, निखिल गोळे, सौरभ गोळे आणि प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Sanitation campaign on Sinhagarh fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.