शहरं

लय भारी! 'अदृश्य शाई' ओळखणार बनावट नोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 11:56 AM

'अदृश्य शाई' ने बनावट नोटा ओळखता येणार आहेत.

Open in App
ठळक मुद्दे'अदृश्य शाई' ने बनावट नोटा ओळखता येणार आहेत. शिव नाडार विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी खोट्या नोटा ओळखण्यासाठी विशिष्ट प्रकारची शाई विकसित केली आहे. शास्त्रज्ञांनी कमी किंमतीतील अदृश्य शाई विकसित केली आहे.

नवी दिल्ली - बनावट नोटांचा वापर करून लोकांना फसवल्याच्या घटना या अनेकदा समोर येत असतात. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही कारण शाईच्या मदतीने खोट्या नोटा ओळखणं आता अधिक सोपं होणार आहे. 'अदृश्य शाई' ने बनावट नोटा ओळखता येणार आहेत. ग्रेटर नोएडा येथील शिव नाडार विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी खोट्या नोटा ओळखण्यासाठी विशिष्ट प्रकारची शाई विकसित केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्रज्ञांनी कमी किंमतीतील अदृश्य शाई विकसित केली आहे. महत्त्वाची कागदपत्रं आणि बनावट नोटा ओळखण्यासाठी या शाईचा उपयोग होणार असून किफायतशीर किंमतीत ती उपलब्ध होणार आहे. या आधीही अशा पद्धतीच्या शाईचा वापर हा करण्यात आला आहे. मात्र ती शाई तयार करण्यासाठी अनेक घटकांचा वापर करण्यात आला असून नव्या शाईच्या तुलनेत ती अधिक महाग असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

शिव नाडार विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी तयार केलेली अदृश्य शाई ही आधीच्या शाईपेक्षा अधिक सुरक्षित आहे. तसेच कमी किंमतीत उपलब्ध असल्याचं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. तसेच या नव्या शाईची माहिती जर्नल ऑफ फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये देण्यात आली आहे. शिव नाडार विद्यापीठातील प्राध्यापक देवदास रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही विकसित केलेल्या पांढऱ्या सुरक्षा शाईतील घटक सहज उपलब्ध होणारे आहेत. ही शाई स्वस्त असून सूर्याच्या प्रकाशात त्याचा वापर केला जातो'.

सुरक्षा आणि ट्रॅफिक फलक, वैद्यकीय तपासणी अशा ठिकाणी वापरले जाणारे आहेत. Ultraviolet Light च्या संपर्कात आल्यावर ही शाई चमकते. नवी शाई तयार करण्यासाठी 45 मिनिटं इतका वेळ लागत असून या शाईची किंमत प्रतिग्रॅम एक हजार रुपये आहे. आकृत्या, चित्रे, बारकोड असे विविध प्रकार या शाईने रेखाटता येणार असून पांढऱ्या कागदावर या शाईने लिहिल्यास अतिरिक्त सुरक्षा पुरवणे शक्य होणार आहे. या शाईचा उपयोग बँकेत नोटा, अधिकृत कागदपत्रे, संरक्षणविषयक कागदपत्रे तयार करण्यासाठी होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

टॅग्स :MONEYपैसाbankबँक
Open in App

संबंधित बातम्या

राष्ट्रीय नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी चव्हाण तर उपाध्यक्षपदी भोसीकर बिनविरोध

राष्ट्रीय Maruti Suzuki चा ग्राहकांना झटका; 'या' कार्सच्या किंमतीत केली मोठी वाढ

राष्ट्रीय Coronavirus : अचानक नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्याची गरज सरकारला का वाटली?; भाजपचा सवाल

राष्ट्रीय Gold : सोनं पुन्हा ५० हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता; पाहा काय आहे त्यामागील कारण

राष्ट्रीय राम मंदिराच्या उभारणीसाठी आलेले २२ कोटी रूपयांचे चेक बाऊन्स; ट्रस्टनं सांगितलं 'हे' कारण

राष्ट्रीय कडून आणखी

राष्ट्रीय Corona virus : केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजनचा पुरवठा होणार

राष्ट्रीय पण, आपण या माणसावर हसुया, मस्करी करुया, राहुल गांधींच्या निर्णयाचं कौतुक

राष्ट्रीय महाराष्ट्रात निवडणुका कुठंयत?; कोरोनावाढीला निवडणुकांशी जोडणं चुकीचं; अमित शाह यांचं मत

राष्ट्रीय coronavirus: मनमोहन सिंग यांनी मोदींना पत्र लिहिले, लसीकरण वाढवण्यासह हे महत्त्वाचे सल्ले दिले 

राष्ट्रीय Humanity : आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होताच, कोरोना ड्युटीवर रुजू झाले 2 डॉक्टर