कर थकबाकीदारांना दणका, २४ मालमत्तांवर टाच; मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 09:46 AM2024-05-18T09:46:43+5:302024-05-18T09:50:22+5:30

या आठवड्यात २४ विविध मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली.

the bmc has now started strict action againest property tax defaulters in mumbai | कर थकबाकीदारांना दणका, २४ मालमत्तांवर टाच; मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर

कर थकबाकीदारांना दणका, २४ मालमत्तांवर टाच; मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर

मुंबई : मालमत्ता कर न भरणाऱ्यांविरोधात पालिकेने आता कठोर कारवाई सुरू केली आहे. या आठवड्यात २४ विविध मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये चार जेसीबी, एक पोकलेनसह विविध साहित्य पालिकेने ताब्यात घेतले. तर, वरळी येथील शुभदा गृहनिर्माण संस्थेला ३५.९४ कोटी रुपयांचा करभरणा करण्यासाठी ४८ तासांच्या मुदतीची नोटीस बजावली आहे.

मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या सूचना आयुक्त भूषण गगराणी यांनी केल्या आहेत. मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले. या आठवड्यात पालिकेच्या ई, डी, जी दक्षिण, पी उत्तर, एच पूर्व, एम पश्चिम, एम पूर्व, एफ उत्तर या विभागांतील करधारकांच्या मालमत्तांवर कारवाई केली आहे. संबंधित मालमत्ताधारकांनी पाच दिवसांत करभरणा न केल्यास जप्त केलेल्या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे.

२५ मे'ची डेडलाइन-

यंदाच्या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याची अंतिम तारीख २५ मे आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तासंबंधी करभरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

१)  एच पूर्व - जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लिमिटेडचे कास्टिंग यार्ड - ८० कोटी रुपये

२)  वरळी - शुभदा गृहनिर्माण संस्था - ३५.९४ कोटी, कर भरण्यासाठी ४८ तासांची मुदत

३)  रेनिसन्स ट्रस्ट ६.७२ कोटी - चार जेसीबी आणि एक पोकलॅन जप्त.

४)  जी दक्षिण - न्यू शरीन टॉकीज- ६ कोटी ४७ लाख - लिलावाची नोटीस जारी

४) मालाड -  शांतिसागर रिॲल्टी प्रायव्हेट लिमिटेडचे भूखंड - १.६५ कोटी रुपये

५)  लोक हाऊसिंग अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेडचे भूखंड - ३.९१ कोटी

६) चेंबूर - जी. ए. बिल्डर्सचे भूखंड - १.०५ कोटी रुपये

७)  फ्लोरा अव्हेन्यू -  व्यावसायिक गाळे - ९२.४२ लाख रुपये

८) अरिहंत रिॲल्टर्सचे भूखंड -  १.९६ कोटी रुपये

९)  ई विभाग - मेसर्स प्रभातचा व्यावसायिक गाळा - ७२ लाख.

१०)  हेक्स रिॲल्टर्सचा व्यावसायिक गाळा - १.१२ कोटी रुपये

११)  मालवणी - डॉटम रिॲल्टीचे भूखंड - १३.०६ कोटी रुपये

१२)    मालाड - क्रिसेंट आदित्य रिॲल्टर्स प्रा. लि.चा भूखंड - २.५० कोटी

१३)  एच पूर्व - एन. जे. फिनस्टॉक प्रा. लि.चा व्यावसायिक गाळा - ४५.८३ लाख रुपये

१४) पी उत्तर - समर्थ डेव्हलपर्सचा भूखंड - २.३१ कोटी

१५) अजंता कर्मवीर ग्रुपचा भूखंड - २.०५ कोटी रुपये

१६)  डी विभाग - श्रीनीजू इंडस्ट्रीजचे व्यावसायिक गाळे - ३.७७ कोटी

१७)   एम पश्चिम - नेत्रावती गृहनिर्माण संस्थेचे भूखंड - ६७.५१ लाख

१८)  विजया गृहनिर्माण संस्थेचे भूखंड - १.६८ कोटी रुपये

१९)  जयश्री डी. कावळे - १.६५ कोटी

२०)   ई विभाग - सय्यद अकबर हुसैन यांचा व्यावसायिक गाळा - ५८.१३ लाख रुपये

२१)  एफ उत्तर - बी. पी. टेक्नो प्रॉडक्ट्स प्रा. लि. यांचे व्यावसायिक गाळे - ४१.०५ लाख

२२) ओसवाल हाइटस्चे व्यावसायिक गाळे - २६.४८ लाख रुपये

Web Title: the bmc has now started strict action againest property tax defaulters in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.