महाराष्ट्र निवडणूक २०१९: क्रिकेटवेड्या पोलिंग ऑफिसरची कमाल, सचिन तेंडुलकरला पाहून काढला सीझन बॉल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 03:36 PM2019-10-21T15:36:26+5:302019-10-21T15:36:30+5:30

maharashtra election 2019 सचिन तेंडुलकरनं पत्नी आणि मुलासोबत बजावला मतदानाचा हक्क

maharashtra election 2019 sachin tendulkar signed a ball at bandra polling booth | महाराष्ट्र निवडणूक २०१९: क्रिकेटवेड्या पोलिंग ऑफिसरची कमाल, सचिन तेंडुलकरला पाहून काढला सीझन बॉल!

महाराष्ट्र निवडणूक २०१९: क्रिकेटवेड्या पोलिंग ऑफिसरची कमाल, सचिन तेंडुलकरला पाहून काढला सीझन बॉल!

Next

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सर्वसामान्यांपासून राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, क्रिकेटपटूंनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंदेखील दुपारच्या सुमारास पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकरसोबत मतदान केलं. वांद्रे पश्चिमेतील मतदान केंद्रावर जाऊन तेंडुलकर कुटुंबानं मतदानाचा हक्क बजावला. 

सचिन तेंडुलकर मतदान केंद्रावर येताच एक मजेशीर प्रसंग घडला. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सचिन मतदान केंद्रावर पोहोचताच एका पोलिंग ऑफिसरनं लेदर बॉलवर सचिनची स्वाक्षरी मागितली. आपल्या या चाहत्याला सचिननंदेखील निराश केलं नाही आणि त्यानं आणलेल्या लेदर बॉलवर स्वाक्षरी केली. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूची स्वाक्षरी मिळाल्यानं पोलिंग ऑफिसरला अतिशय आनंद झाला. 

सचिन मतदान केंद्रावर येताच उपस्थितांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सचिननं कुटुंबासोबत फोटोदेखील काढला. मात्र यावेळी सचिनसोबत मुलगी सारा उपस्थित नव्हती. सारा परदेशात असल्यानं मतदानासाठी उपस्थित राहू न शकल्याचं समजतं आहे. सचिन मतदानाच्या बाबतीत अतिशय जागरुक असल्याचं नेहमीच पाहायला मिळतं. 

मतदान करुन बाहेर पडताना सचिननं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यानं घराबाहेर पडून अधिकाधिक मतदान करण्याचं आवाहन केलं. 'तुमच्या उज्ज्वल उद्यासाठी आज मतदान करणं गरजेचं आहे. मी मतदान केलं आहे. तुम्हीदेखील मतदान करा. तो तुमचा अधिकार आहे,' अशा शब्दांमध्ये सचिननं मतदानाचं आवाहन केलं. 
 

Web Title: maharashtra election 2019 sachin tendulkar signed a ball at bandra polling booth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.