Lok Sabha Election 2024 : विदर्भात कोणाची हवा? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? सर्व्हेतील अंदाज आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 09:08 PM2024-04-16T21:08:49+5:302024-04-16T21:13:43+5:30

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे.

Lok Sabha Election 2024 in Vidarbha Which party will get how many seats? The forecast from the survey came forward | Lok Sabha Election 2024 : विदर्भात कोणाची हवा? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? सर्व्हेतील अंदाज आला समोर

Lok Sabha Election 2024 : विदर्भात कोणाची हवा? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? सर्व्हेतील अंदाज आला समोर

Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीची सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. उमेदवारी जाहीर होऊन आता जाहीर सभांचा धडाका सुरू झाला आहे. या लोकसभा निवडणुकीत अनेक बदल्याचे राजकारण पाहायला मिळणार आहे. दरम्यान, ऐन प्रचारांच्या धडाक्यात आता  एबीपी-सीव्होटरचा राज्यातील फायनल ओपीनीअन पोल समोर आला आहे. या पोलमध्ये विदर्भातही मोठे बदल झाल्याचे समोर आले आहे. 

रामटेक लोकसभा मतदारसंघ

विदर्भात आठ लोकसभा मतदारसंघ आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजू पारवे आहेत, तर महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे आहेत. विंचित बहुजन आघाडीने किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. या मतदारसंघात राजू पारवे यांना आघाडी मिळणार असल्याचे चित्र या पोलमध्ये दिसत आहे. 

महाराष्ट्रात दोन महिन्यांत बाजी पालटली? 48 पैकी 18 जागा...; फायनल ओपिनिअन पोल आला

नागपूर लोकसभा मतदारसंघ

नागपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत, तर महाविकास आघाडीकडून विकास ठाकरे मैदानात आहेत, या मतदारसंघात भाजपाचे नितीन गडकरी आघाडीवर असल्याचे पोलमध्ये दिसत आहे. 

वर्धा लोकसभा मतदारसंघ

वर्धा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून रामदास तडस यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर महाविकास आघाडीकडून अमर काळे मैदानात आहे. वंचित बहुजन आघाडीने राजेंद्र साळुंके यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात भाजपाचे रामदास तडस हे आघाडीवर असल्याचे पोलमध्ये दिसत आहे. 

अमरावती लोकसभा मतदारसंघ

अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीने नवनीत राणा यांना तर महाविकास आघाडीने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. तर दिनेश बूब यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात भाजपाच्या नवनीत राणा आघाडीवर असल्याचे पोलमध्ये दिसत आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघ

अकोला लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अनुप धोत्रे, महाविकास आघाडीने अभय पाटील यांना मैदानात उतरवले आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरही अकोला मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात विजय भाजपाच्या अनुप धोत्रे यांच्यासाठी विजय सोपा असल्याच पोलमध्ये दाखवले आहे.  

बुलढाणा लोकसभा मतदारसंघ

बुलढाणा लोकसभेत महायुतीकडून प्रतापराव जाधव यांनी उमेदवारी दिली आहे, महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडकर मैदानात आहेत. तर वंचितकडून वसंत मगर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या नरेंद्र खेडेकर यांना आघाडी मिळणार असल्याचे पोलमध्ये दाखवले आहे. 

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात महायुतीने सुनील मेंढे यांना तर म्हाविकास आघाडीने प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघात वंचितनेही उमेदवार जाहीर केला असून संजय केवट यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात महायुतीचे सुनील मेंढे आघाडीवर असल्याचे पोलमध्ये दाखवले आहे. 

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघ

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात महायुतीने अशोक नेते यांना महाविकास आघाडीने नामदेव किरसान यांना तर वंचितने हितेश मडावी यांना उमेदवारी दिली आहे, या मतदारसंघात काँग्रेसचे नामदेव किरसान आघाडीवर असल्याचे पोलमध्ये दाखवले आहे. 

विदर्भातील काही जागांवर लढत चुरशीची असणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसला एकच जागा मिळाली होती. पण, आता विदर्भात काँग्रेसच्या दोन जागा आघाडीवर असल्याचे दिसत असून लढत चुरशीची असणार आहे. 

Web Title: Lok Sabha Election 2024 in Vidarbha Which party will get how many seats? The forecast from the survey came forward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.