डिजिटल इंडियालाही कोरोनाचा फटका; एप्रिल महिन्यातील व्यवहारांमध्ये ६० टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 03:05 AM2020-05-29T03:05:46+5:302020-05-29T06:27:54+5:30

अहवालातील निष्कर्ष

Corona hits Digital India too; 60% decline in April transactions | डिजिटल इंडियालाही कोरोनाचा फटका; एप्रिल महिन्यातील व्यवहारांमध्ये ६० टक्के घट

डिजिटल इंडियालाही कोरोनाचा फटका; एप्रिल महिन्यातील व्यवहारांमध्ये ६० टक्के घट

Next

मुंबई : नोटबंदीनंतर केंद्र सरकारने ‘डिजिटल इंडिया’चा नारा दिला असला तरी त्यात अपेक्षित यश आलेले दिसत नाही. टप्प्याटप्प्याने देशात या व्यवहारांना चालना मिळत असली तरी २०१९ आणि २०२० वर्षातील जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीचा आढावा
घेतल्यास डिजिटल व्यवहारांमध्ये १० टक्के घट झाली असून या माध्यमातून होणारी उलाढाल १२ टक्क्यांनी कमी झाली आहे. तर, एप्रिल महिन्यात हे व्यवहार ६० टक्क्यांनी कमी झाले आहेत.

‘वर्ल्डलाइन इंडिया डिजिटल पेमेंट’ रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. डिजिटल व्यवहारांमध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली या राज्यांचा क्रमांक आहे. शहरांमध्ये मात्र बंगळुरू आघाडीवर असून चेन्नईपाठोपाठ मुंबई आणि पुण्याचा क्रमांक लागतो. किराणा सामान, रेस्टॉरंट, पेट्रोल आणि कपडे खरेदीसाठी डिजिटल पेमेंटचा सर्वाधिक वापर होतो.

पहिल्या तिमाहीत मोबाइल अ‍ॅपच्या साहाय्याने झालेले व्यवहार ४२५ कोटी तर, नेट बँकिंगचे व्यवहार ८१ कोटींचे आहेत. जानेवारी ते मार्च २०२० या तीन महिन्यांत देशात विविध बँकांनी ५० लाख नवे पीओएस (पॉइंट आॅफ सेल्स - जिथे आॅनलाइन व्यवहार होतात अशी केंद्रे) कार्यान्वित केली आहेत. त्यात खासगी बँकांचा वाटा ६९ टक्के होता.

व्हॅलेंटाइन डेसाठी सर्वाधिक वापर

देशात डिजिटल पेमेंटचा सर्वाधिक वापर ९ फेब्रुवारी रोजी झाला. १४ एप्रिलच्या व्हॅलेंटाइन डेच्या आधीचा वीकेण्ड होता. तसेच, सर्वाधिक व्यवहार जानेवारी महिन्यात झाल्याचे हा अहवाल सांगतो.

Web Title: Corona hits Digital India too; 60% decline in April transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.