lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > "बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली

"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली

Ashneer Grover digs at Kotak Mahindra Bank: खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेला काही दिवसांपूर्वी आरबीआयनं ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलवरून नवीन ग्राहक जोडण्यापासून बंदी घातल्यानं मोठा झटका बसला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 03:58 PM2024-04-27T15:58:57+5:302024-04-27T16:00:03+5:30

Ashneer Grover digs at Kotak Mahindra Bank: खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेला काही दिवसांपूर्वी आरबीआयनं ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलवरून नवीन ग्राहक जोडण्यापासून बंदी घातल्यानं मोठा झटका बसला होता.

ashneer-grover-says-banks-se-tech-nahi-ho-rahi-as-kotak-mahindra-bank-share-prices-drop-11-percent-social-media-post | "बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली

"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली

Ashneer Grover digs at Kotak Mahindra Bank: खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेला काही दिवसांपूर्वी आरबीआयनं ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलवरून नवीन ग्राहक जोडण्यापासून बंदी घातल्यानं मोठा झटका बसला होता. याशिवाय आता बँक नवीन क्रेडिट कार्डदेखील जारी करू शकणार नाही. 
 

परिणामी २५ एप्रिलला बँकेचे शेअर्स ११ टक्के आणि त्यानंतर २६ एप्रिलला २ टक्क्यांनी घसरले. यावरून अश्नीर ग्रोव्हरने कोटक महिंद्रा बँकेवर निशाणा साधला आहे. बँकेकडून टेक्नॉलॉजी होऊ शकत नाही आमि फिनटेककडून बँकिंग होत नाही, असं अशनीर ग्रोव्हर म्हणाले. 
 

 

युझर्सनं काय म्हटलं?
 

अशनीर ग्रोव्हर यांच्या एक्स पोस्टवर युजर्सनंही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलं आहे की, आताच लालाजी स्टाईल बँकिंग तंत्रज्ञानानं जोडल्या आहेत आणि जुने नियम तंत्रज्ञानासोबत चांगले वाटत नाहीत. जुन्या मानसिकतेचं नेते बदलासाठी अजिबात तयार नसतील तर, तंत्रज्ञानाचा मार्ग सोपा नाही, असं आणखी एका युजरनं लिहिलं आहे. आणखी एका युजरनं आरबीआयवर निशाणा साधला आहे. पेटीएम, एचडीएफसी बँक, आयआयएफएल फायनान्स, जेएम फायनान्शिअलमध्ये शेअरहोल्डर्सचे पैसे बुडवल्यानंतर आता आरबीआयनं कोटक महिंद्रा बँकेची शिकार केली असल्याचं म्हटलं.
 

अशनीर ग्रोव्हर आणि कोटकचा वाद
 

अशनीर ग्रोव्हर आणि कोटक महिंद्रा बँक यांच्यात आधीच कटुता आहे. अशनीर ग्रोव्हर आणि त्याची पत्नी माधुरी यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक, तसंच त्यांच्या टीमला कायदेशीर नोटीस पाठवली होती. त्यांनी नायकाच्या आयपीओमध्ये फंडिंग आणि शेअर अलॉटमेंटसाठी मदत केली नसल्याचा त्यांनी आरोप केला होता. अशनीर ग्रोव्हर आणि कोटक ग्रुपच्या कर्मचाऱ्याचा वाद सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कायदेशीर कारवाई चर्चेत आली. एका अज्ञात ट्विटर अकाऊंटनं एक कथित ऑडिओ क्लिप शेअर केली होती, ज्यात अशनीर ग्रोव्हर कोटक कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकावत होते. त्यानंतर अशनीर ग्रोव्हर यांनी लगेच प्रतिक्रिया देत हा ऑडिओ फेक असल्याचं म्हटलं होतं.

Web Title: ashneer-grover-says-banks-se-tech-nahi-ho-rahi-as-kotak-mahindra-bank-share-prices-drop-11-percent-social-media-post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.