मला त्रास देणाऱ्यांची नावं उघड करणार; एकनाथ खडसेंनी खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 07:00 PM2019-11-06T19:00:51+5:302019-11-06T19:13:22+5:30

आपल्यावर अनेक आरोप झाले. त्यात तथ्य आढळले नाही. निर्दोष असूनही अनेकांनी त्रास दिला, तरीही आपण श्रद्धा व सबुरीचे धोरण ठेवले़. लवकरच आपण मला त्रास देणारांची नावे उघड करणार असल्याचा इशारा भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला़.

I will reveal the names of those who harass me - Eknath Khadse; Shirdi sightseeing | मला त्रास देणाऱ्यांची नावं उघड करणार; एकनाथ खडसेंनी खडसावले

मला त्रास देणाऱ्यांची नावं उघड करणार; एकनाथ खडसेंनी खडसावले

googlenewsNext

शिर्डी : आपल्यावर अनेक आरोप झाले. त्यात तथ्य आढळले नाही. निर्दोष असूनही अनेकांनी त्रास दिला, तरीही आपण श्रद्धा व सबुरीचे धोरण ठेवले़ लवकरच आपण आत्मचरित्र लिहिणार असून त्यात त्रास देणारांची नावे उघड करणार असल्याचा इशारा भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला़.
खडसे यांनी बुधवारी सहकुटूंब साईदरबारी हजेरी लावली़. यावेळी संस्थानचे सीईओ दीपक मुगळीकर यांनी त्यांचा सत्कार केला़. यावेळी डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे, माजी विश्वस्त सचिन तांबे आदींची उपस्थित होते़. खडसे पुढे म्हणाले, राज्यातील जनतेने महायुतीला निवडून दिले आहे़. दोन्ही पक्षातील तणाव काही दिवसात मिटेल. शेवटच्या क्षणाला महायुतीचेच सरकार येईल. राज्यात स्थीर व महायुतीचे सरकार यावे यासाठी यासाठी प्रार्थना केली आहे. युती करताना दोन्ही पक्षाचे काय ठरले ते माहीत नाही़. मुख्यमंत्री ठरविण्याएवढा मी मोठा नाही़. त्यामुळे माझ्यासारख्याला त्यावर प्रतिक्रिया देता येणार नाही़. निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे घोषित केले आहे़. त्यावर पक्षाध्यक्ष अमीत शहा यांनीही शिक्कामोर्तब केले आहे़. त्यामुळे आमच्या नजरेसमोर भाजपा व महायुतीचा नेता म्हणून फडणवीसच आहेत़.
शिवसेना आक्रमक असताना भाजप शांत आहे. याचा अर्थ तो बॅकफुटवर आहे असा नाही़. पक्षाचा तो स्वभाव आहे़. तणाव न वाढवता मार्ग निघेल़. महायुती टिकविण्याच्या दृष्टीने भाजपाने भुमिका स्वीकारलेली दिसते़. तणाव संपून संवाद वाढावा व एकत्रिकरण व्हावे, त्या माध्यमातून चांगला निर्णय व्हावा अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली़. संघाने भाजपाला कधी आदेश दिल्याचे आठवत नाही. आजवर संघाने योग्य ते मार्गदर्शन केल आहे़. संघाने आताही सल्ला दिला असेल त्यांना तो अधिकार आहे.

Web Title: I will reveal the names of those who harass me - Eknath Khadse; Shirdi sightseeing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.