भाजप खासदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; पक्षाने यंदा तिकीट कापले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 07:25 PM2024-04-24T19:25:36+5:302024-04-24T19:26:15+5:30

उत्तर प्रदेशातील हाथरस लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजवीर दिलेर यांचे आज निधन झाले.

BJP MP rajveer diler dies of heart attack; party did not give him lok sabha ticket | भाजप खासदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; पक्षाने यंदा तिकीट कापले...

भाजप खासदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; पक्षाने यंदा तिकीट कापले...


UP News: उत्तर प्रदेशातील हाथरस लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार राजवीर दिलेर यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अलीगढ येथील वरुण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2019 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसबा निवडणूक जिंकली होती. मात्र, यावेळी पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कुटुंबीय, पक्ष व समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे.

राजवीर दिलेर त्यांच्या निवासस्थानी बसले होते, यावेळी अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि ते बेशुद्ध पडले. उपस्थित लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, पण डॉक्टर त्यांचा जीव वाचवू शकले नाहीत.

अडीच लाखांहून अधिक मतांनी विजय
राजवीर दिलर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर लढताना अडीच लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. मात्र, यावेळी पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. यावेळी त्यांच्या जागी राज्यमंत्री अनूप वाल्मिकी यांच्यावर भाजपने विश्वास टाकला आहे.

तिकीट कापले, पाच दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न, त्यातून वाचले; खासदार गणेशमुर्तींचे आज हार्ट अ‍ॅटॅकने निधन

भाजप उमेदवार सर्वेश सिंह यांचे शनिवारी निधन 
गेल्या शनिवारी मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान उमेदवार कुंवर सर्वेश सिंह यांचे निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. याच कारणामुळे ते निवडणूक प्रचारापासून दूर होते. हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील एम्समध्ये त्यांचे निधन झाले. पहिल्या टप्प्यातील मतदानातही (19 एप्रिल) त्यांनी मतदान केले होते. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला.

Web Title: BJP MP rajveer diler dies of heart attack; party did not give him lok sabha ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.