भिवंडी लोकसभेत पहिल्याच दिवशी ५४ उमेदवारी अर्जांचे वाटप

By नितीन पंडित | Published: April 26, 2024 04:26 PM2024-04-26T16:26:43+5:302024-04-26T16:27:22+5:30

भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून भिवंडी प्रांताधिकारी कार्यालयात शुक्रवारी सकाळ पासून उमेदवारी अर्ज वाटप सुरू झाले आहे.

Distribution of 54 nomination papers in Bhiwandi Lok Sabha on the first day itself | भिवंडी लोकसभेत पहिल्याच दिवशी ५४ उमेदवारी अर्जांचे वाटप

भिवंडी लोकसभेत पहिल्याच दिवशी ५४ उमेदवारी अर्जांचे वाटप

भिवंडी: भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून भिवंडी प्रांताधिकारी कार्यालयात शुक्रवारी सकाळ पासून उमेदवारी अर्ज वाटप सुरू झाले आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून २५ उमेदवारांना पहिल्याच दिवशी ५४ उमेदवारी अर्ज वाटप करण्यात आले असून एकाही उमेदवाराने पहिल्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याची माहिती भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.

प्रांत कार्यालयात उमेदवारी अर्ज घेऊन येणाऱ्या उमेदवारांचे अर्ज तपासणी तसेच उमेदवारी अर्जाला जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व वेगळी व्यवस्था केली असल्याचेही जाधव यांनी यावेळी सांगितले आहे.

Web Title: Distribution of 54 nomination papers in Bhiwandi Lok Sabha on the first day itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.