मंगळवार २५ जुलै २०१७

Menu

होम >> क्रीडा >> स्टोरी
सात षटकारांसह नितीश राणाने रचला इतिहास
First Published: 21-April-2017 : 16:08:07
ऑनलाइन लोकमत 
इंदूर, दि. 21 - यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा राणादा अर्थात नितीश राणाचा बोलबाला दिसून येत आहे. काल रात्रीही पंजाबने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना राणा आणि जोस बटलर यांनी तुफानी खेळी करत  मुंबईला विजय मिळवून दिला. या लढतीत 62 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या नितीश राणाने फलंदाजीदरम्यान एक अनोखा इतिहास रचला. 
राणाने या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांची पिटाई करताना 34 चेंडूत 62 धावा कुटल्या. या खेळीत त्याने सात उत्तुंग षटकार ठोकले. या सात षटकारांसोबत आयपीएलमध्ये राणाच्या नावे नवा विक्रम नोंदवला गेला. आपल्या खेळीदरम्यान एकही चौकार न मारत सात षटकार ठोकणारा नितीश राणा हा आयपीएलमधील एकमेव फलंदाज ठरला आहे.
त्याबरोबरच पंजाबविरुद्धच्या 62 धावांच्या जोरावर आयपीएलमधील आपली एकूण धावसंख्या 255 वर नेत राणाने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले. दरम्यान, या लढतीत  नितीश राणा, जोस बटलर आणि पार्थिव पटेल यांच्या तुफानी खेळींच्या जोरावर मुंबईने पंजाबने दिलेल्या 199 धावांच्या आव्हानाचा 8 गडी आणि 27 चेंडू राखून फडशा पाडला.  
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com