मंगळवार २७ जून २०१७

Menu

होम >> क्रीडा >> स्टोरी
सौराष्ट्राच्या खेळाडूंनी छाप सोडली
First Published: 21-March-2017 : 01:03:38

ही खेळपट्टी अखेरपर्यंत कळलीच नसल्याची प्रचिती आली. खेळपट्टीने प्रत्येकाचे अंदाज फोल ठरविले. खेळाची रंगत वाढविणाऱ्या दर्जाची खेळपट्टी निर्माण करता आली नसली, तरी क्युरेटर व मैदानावरील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आज सायंकाळी हसू फुलणार असल्याचे स्पष्ट आहे. स्मिथ आणि मॅक्सवेल, पुजारा आणि साहा यांनी आपल्या फलंदाजीची छाप सोडली. यष्टिरक्षक फलंदाजाचा सुरू असलेल्या शोधासाठी उपयुक्त पर्याय ठरू शकत असल्याचे साहाने सिद्ध केले आहे. मॅक्सवेलची प्रशंसा होत असली, तरी त्याला अद्याप दर्जा सिद्ध करायचा आहे.

पुजाराने द्विशतकी खेळीने छाप सोडली. पुजारा परंपरागत कसोटी क्रिकेटच्या मुशीतील आहे. आॅस्ट्रेलियाने भारताचा पहिला डाव लवकर गुंडाळला असता, तर यजमान संघाला या खेळपट्टीवर चौथ्या डावात फलंदाजी करावी लागली असती. त्यामुळे पुजाराची खेळी महत्त्वाची ठरते. पुजाराने आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला असता, तर कदाचित भारताचा डाव लवकर संपुष्टात येण्याची शक्यता होती. रणजी स्पर्धेत सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणारे जडेजा व पुजारा यांनी या लढतीत वर्चस्व गाजवले.

उजव्या हाताने मारा करणारे दोन वेगवान गोलंदाज आणि चार डावखुऱ्या फलंदाजांची आॅस्ट्रेलिया संघाने केलेली निवड जडेजासाठी लाभदायक ठरण्याची आशा होती. खेळपट्टीवर गोलंदाजांचे फूटमार्क नसताना जडेजाने पहिल्या डावात गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली. जडेजाच्या तुलनेत आश्विनची कामगिरी निराशाजनक ठरली. जडेजाने चमकदार कामगिरी करीत कुठल्याही खेळपट्टीवर गोलंदाजी करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले.

मुळात क्रिकेट हा खेळच खडतर आहे आणि त्यात भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी क्रिकेटची रंगत वेगळीच असते. यंदाच्या प्रदीर्घ क्रिकेट मोसमाचा शेवट धरमशाला येथे उभय संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्याने होणार आहे. (पीएमजी)

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com