सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> 428 >> स्टोरी
सावधान ! डाएटसाठी कृत्रिम स्वीटनरचा वापर आरोग्यासाठी हानिकारक
First Published: 17-July-2017 : 14:41:52
Last Updated at: 17-July-2017 : 15:36:39

ऑनलाइन लोकमत

टोरॅन्टो, दि. 17 - हल्ली सर्वांमध्ये साईज झीरोची क्रेझ पसरली आहे.  यासाठी मग डायेटींग करणं, उपाशी राहणं, व्यायाम करण्यावर भर दिला जातो. विशेष म्हणजे वजन घटवण्यासाठी साखर वर्ज्य केली जाते. मात्र, खाण्यात गोडवा कायम राहावा, अशी बहुतांश लोकांची इच्छा असते. पण प्रत्यक्षात गोड खाणं टाळलं जाते. यासाठी कृत्रिम स्वीटनरचा पर्याय अवलंबला जातो. 
 
पण कृत्रिम स्वीटनर आरोग्यासाठी हानिकारक असल्याची माहिती एका अहवालाद्वारे समोर आली आहे. कृत्रिम स्वीटनरमुळे वजन वाढणं तसे लठ्ठपणाचा धोका निर्माण होऊ शकतो, मधुमहे, उच्च रक्तदाब व हृदयरोग यांसारखे शारीरिक आजार उद्भवू शकतात. कारण कृत्रिम स्वीटनर शरीरासाठी धोकादायक आहेत, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.  
 
कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ मॅनिटोबातील संशोधनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुक्रोज व स्टेविया यांसारख्या कृत्रिम स्वीटनरचा दैनंदिन जीवनात वापर वाढत आहे. कृत्रिम तसेच शरीरासाठी पोषक नसलेल्या स्वीटनरमुळे पचन शक्ती, रोग प्रतिकारक शक्ती व भूकेवर वाईट परिणाम होत असल्याचं संशोधनात आढळले आहे.
 
वजन व हृदयाच्या आरोग्यावर कृत्रिम स्वीटनरमुळे होणा-या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी संशोधन कर्त्यांनी अभ्यास केला. या अभ्यासात जवळपास 10 वर्षाच्या कालावधीत 4,00,000 लोकांचा समावेश होता. दीर्घकालीन संशोधनात कृत्रिम स्वीटनरच्या वापरात तुलनेनं वजन वाढण्याचा धोका, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह व हृदयरोग तसंच अन्य शारीरिक संबंधी आजार निदर्शनास आले. हे संशोधन कॅनडियनमधील मेडिकल असोसिएशन जर्नल (सीएमएज)मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. 
 
 
लठ्ठपणावरील संशोधन
पोटाची चरबी वाढायला लागलीय, वजनाचा काटा उजवीकडे झुकू लागलाय?
ज्या व्यक्तींना गुडघेदुखी, सांधेदुखीचा त्रास असतो, त्यांचं वजनही बहुदा जास्त असतं. अर्थात ‘जास्त’ म्हणजे त्या त्या व्यक्तीच्या आणि त्याच्या तरुणपणाच्या वजनाच्या तुलनेत!
 
हे रिलेशन आता शास्त्रज्ञांनीही उलगडून दाखवलंय. पण त्यासाठी त्यांनी तब्बल २१ वर्षे संशोधनही केलं आणि त्यातली केवळ सत्यासत्यताच नाही, तर इतर अनेक गोष्टीही तपासून पाहिल्या.
 
लठ्ठपणाचा संबंध नेमका कशाशी जोडला जातो? कोणाला लठ्ठ म्हणायचं? त्या त्या व्यक्तीचा बॉडी मास इंडेक्स म्हणजेच बीएमआय, त्या व्यक्तीच्या पोटाचा घेर, त्याभोवती साचलेली चरबी आणि फॅटच शरीरातील जास्तीचं प्रमाण.. या प्रमुख घटकांवर तुमचा लठ्ठपणा अवलंबून असतो आणि त्यावरच ती व्यक्ती लठ्ठ आहे की नाही, लठ्ठपणाचं प्रमाण किती आहे हे ठरवलं जातं.
 
डेन्मार्कच्या शास्त्रज्ञांनी ५० ते ६४ या वयोगटातील काही स्त्री आणि पुरुषांचा अभ्यास केला. तब्बल २१ वर्षे यासंबंधीचा त्यांचा अभ्यास सुरू होता. त्यातून त्यांनी काढलेला निष्कर्ष असा, की ज्या व्यक्ती लठ्ठ आहेत, त्यांना संधीवाताचा त्रास जास्त होतो, त्यातही महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे.
 
ज्या महिलांचं वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल, तुलनेनं अधिक लठ्ठ असतील, तर त्यांच्यात संधीवाताचं प्रमाण जास्त असतं किंवा त्यांना संधिवात होण्याचा धोका अधिक प्रमाणात वाढतो.
 
आश्चर्यकारकपणे लठ्ठपणा आणि संधिवाताचं हे समीकरण पुरुषांमध्ये मात्र शास्त्रज्ञांना आढळून आलं नाही. जे पुरुष लठ्ठ आहेत, त्यांना भविष्यात संधिवात होईलच, हे मात्र ठामपणे सांगता येऊ शकत नाही. महिलांसाठी मात्र हे मोठ्या प्रमाणात लागू आहे, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे.
 
त्यामुळे महिलांनो, तुमचं वजन आणि लठ्ठपणा वाढू देऊ नका. तरुणपणीच ही काळजी घेतली तर उत्तरायुष्यात अनेक विकारांपासून, त्यातही संधिवातासारख्या अतिशय त्रासदायक विकारापासून तुमची सुटका होऊ शकते.
 
आयुष्याच्या सायंकाळीही आपलं आरोग्य टिकवायचं असेल, नातवंडं, पतवंडं यांना तुमच्या अनुभवाचा फायदा द्यायचा असेल, प्रेमानं त्यांचे लाडकोड करायचे असतील, त्यांना अंगाखांद्यावर फिरवायचं, मिरवायचं असेल तर ही काळजी आतापासूनच घ्या.
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com