सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> 428 >> स्टोरी
सांभाळा, तुमचा मोबाइलही हॅक होतोय ..
First Published: 14-July-2017 : 17:38:26

-योगेश हांडगे

मोबाईल हॅक होण्याच्या, व्हॉट्स अ‍ॅप हॅक होण्याच्या काही घटना अलिकडेच घडल्या. त्यानं आपल्याला धास्तीही वाटली की आपला फोन कुणी असा हॅक करु शकतो का? तर अर्थातच तो करू शकतो आणि त्यात अवगड असं काही नाही. जीएसएम तंत्रज्ञान असलेले मोबाईलला हॅक करण्यासाठी लागणारं हार्डवेअर आरामात जोडता येतं. मोबाइल हॅक करण्यासाठी हॅकर्सकडून काही विशिष्ट ‘लिंक’ (मालवेअर ) नागरिकांना पाठविली जाते. नागरिकांना फोन करून त्या लिंक पाठवलेले मेल, मेसेज उघडण्यास सांगण्यात येतं. अनेकदा सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचा बनाव करून नागरिकांशी संपर्क साधण्यात येतो. किंवा हॅकर्स केवळ एक मेसेज पाठवून आपल्याला हवा त्याचा मोबाईल हॅक करून त्यावरील संभाषण, माहिती, छायाचित्र सहज मिळवू शकतात. म्हणून आपल्याला माहिती हवं की हे हॅकिंग असतं काय?

हॅकर्स काय करतात ?

* हॅकिंगमध्ये अनेकदा फोनमध्ये स्टोअर असलेली माहितीही बदलली जाते

* अनेकवेळा मोबाईलचा डेटा हॅक करून बँक खात्यातून परस्परच पैसे दुसऱ्या खात्यात वळविले जातात .

* मोबाइलमध्ये सुरू असलेले सर्व अ‍ॅप्लिकेशन अगदी मेल, फेसबुक, ट्विटरसुद्धा हॅक होवू शकतं. मेलमध्ये असलेल्या डाटाचा वापर करत ‘क्र ेडिट, डेबिट’ कार्डची गोपनीय माहिती मिळवून त्याद्वारे लाखो रु पये काढले जातात .

* मोबाइलमधील अ‍ॅप्स अनपेक्षतिरीत्या सुरू किंवा बंद होणं,

काय काळजी घ्याल?

* ब्ल्यू टूथ वापरत असाल तर ते बंद किंवा इनिव्हझबिल मोडमध्ये ठेवा.

* त्याशिवाय फोन सतत अपडेट करत रहा.

* तुमच्या फोनला पासवर्ड असू द्या. त्यामुळे दुसरा कोणीही तुमच्या फोनचा वापर करू शकणार नाही.

* मोबाइलवर आलेल्या कुठल्याही अनोळखी मेसेजमध्ये एखादी लिंक पाठवली गेली असेल, तर ती उघडू नका. मेलमधीलसुद्धा अनोळखी लिंक उघडू नका

* अ‍ॅण्टिव्हायरस अ‍ॅप इन्स्टॉल करा.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com