सोमवार २६ जून २०१७

Menu

होम >> 428 >> स्टोरी
मोबाइलच चार्ज करताना चुकता म्हणून तुमचा मोबाइल बिघडतो!
First Published: 16-June-2017 : 13:47:37

- नितांत महाजन

मोबाइल चार्ज नसेल आणि तो बंद पडला की आपणच किती हायपर होतो ते आठवून पहा. प्रचंड त्रास होतो. आपण बेचैन होतो. कुठं कुठं चार्जर शोधतो, मागतो, उसना आणतो. कुठं प्लग दिसला की लावतो तिथं चार्र्जिंगला. काहीजण तर रेल्वे स्टेशन, मॉल, हॉटेल्स इथंही फोन चार्जिंगला लावून बोलत असलेले दिसतात. पण कधी विचार केलाय का? आपल्या फोनचं मॅन्युअल कधी वाचलंय का कधी आणि कसा फोन चार्ज करावा? काय करावं? काय टाळावं? फोनची बॅटरी आणि त्याचा परफॉर्मन्स यांचं काही नातं असतं की नाही? पण हे सगळं माहितीच नसल्यानं काही चूका आपण करतोच. आणि मग त्या सतत करत राहिल्यानं आपले फोन सतत बिघडतात. आणि दुरुस्त तरी करावे लागतात नाहीतर नवीन तरी घ्यावे लागतात. फोनच्या बिघडण्याचं कारण अनेकदा या चुकीच्या चार्जिंगमध्ये आढळतं. त्यामुळे त्या चूका कोणत्या हे समजून घेवून त्या टाळणं उत्तम. तरच तुमच्या मोबाईलचं लाइफ वाढेल!

१) बॅटरी पार उतरण्याची वाट पाहत बसता तुम्ही? १ टक्का उरली , फोन टुंगटुंग वाजत असला तरी फोनवर बोलणं सुुरुच. फोन पूर्ण बंद करेपर्यंत चार्जिंगलाच लावत नाही? मग तुमचा फोन लवकर बिघडणारच. शक्यतो बॅटरी १५% असतानाच फोन चार्जिंगला लावावा पूर्ण बंद पडण्याची वाट पाहू नये. फोन बंद पडला की चार्ज करणं ही महामोठी चूक.

२) शंभर टक्के बॅटरी चार्ज करता तुम्ही? कशाला? त्याची काही गरज नसते. फोन चार्जिंगला लावून अजिबात झोपू नये. बॅटरी शंभर टक्के चार्ज करू नये. त्यानं बॅटरीवरचा ताण वाढतो. त्यामुळे फक्त ८५ % इतकीच बॅटरी चार्ज करावी.

३) चार्जिंगला लावलेला फोन तसाच ठेवून तुम्ही फोनवर बोलता? हे तर अत्यंत चूक. फोन चार्जिंगला असताना कानाला फोन लावू नये. त्याचं रेडिएशन जास्त असतं. त्यानं फोन चार्र्जिंगवर तर ताण येतोच, पण आपल्या आरोग्यासाठीही ते त्रासदायक असतं.

४) कुठंही जा, दिसला प्लग की फोन चार्जिंगला लावणं सोडा. एकतर त्याची गरज नसते. बॅटरी १५ टक्केपर्यंत खाली येईपर्यंत फोन चार्ज करूच नये. दुसरं सगळ्याकडच्या चांगल्या वाईट प्लग मध्ये कुणाचाही कुठलाही चार्जर घेवून बॅटरी चार्ज करू नये.त्यानंं फोनचे चार्जिंग सॉकेट खराब होतात.

५) ओव्हरर्चार्जिंंग टाळायलाच हवं. काहीजण सतत फोन चार्ज करतात. त्यामुळे तो ओव्हरचार्ज होत राहतो, त्यानं फोनच्या प्रोसेसिंग सिस्टिमवर ताण येतो.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com