सोमवार २६ जून २०१७

Menu

होम >> 428 >> स्टोरी
डायबेटिसच्या रुग्णांना आता ‘कोयी’च्या भावात ‘आंबे’!
First Published: 15-June-2017 : 18:01:47

- मयूर पठाडे

‘आम तो आम, गुठलीयों के भी दाम’.. अशी एक म्हण आहे. ‘आंब्यां’बरोबरच त्यांची ‘कोय’देखील आपलं उखळ कधीकधी कसं पांढरं करते याचा अनुभव आपणही घेतला असेल. प्रत्येकासाठीचा हा ‘आंबा’ आणि ही ‘कोय’ मात्र प्रत्येकवेळी वेगवेगळी असते. याच म्हणीचा प्रत्यय आता आरोग्याच्या क्षेत्रातही आला आहे आणि डायबेटिसच्या रुग्णांसाठी आता ‘कोयी’च्या भावात ‘आंबे’ मिळणार आहेत!

जगातलं सर्वात मोठं म्हणता येईल असं एक संशोधन नुकतंच अमेरिकेत करण्यात आलं आणि सॅन दिएगो इथल्या कॉन्फरन्समध्ये ते मांडण्यातही आलं. तब्बल तीस देशांतल्या दहा हजार पेशंटवर काही चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून शास्त्रज्ञांच्या हाती अतिशय विलक्षण अशी माहिती आली आहे.

डायबेटिसच्या रुग्णांसाठी स्वस्तातली बरीच औषधं मिळतात. ज्यांची किंमत फार नाही. कॅनॉग्लिफ्लोझीनसारखी ही औषधं आता एकाच गोळीत अनेक शिकार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. हा अभ्यास आरोग्याच्या क्षेत्रात ‘गेमचेंजर’ म्हणून जगभरातील रुग्णांसाठी उपयोगी ठरेल असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ञांनी व्यक्त केला आहे.

काय आहे या संशोधनाचा फायदा?

 

१-टाइप टू प्रकारच्या डायबेटिससाठी घेतली जाणारी ही औषधं हृदयविकाराच्या धोक्यापासूनही रुग्णांना वाचवू शकतात.

२- किडनी विकारांपासूनही औषधं रुग्णांचं संरक्षण करतात.

३- डायबेटिस अनेक आजारांचं माहेरघर आहे. डायबेटिसमुळे किडनी विकारांची शक्यताही मोठ्या प्रमाणात वाढवते, पण डायबेटिसवरची ही औषधं किडनीविकारांची क्षमता तब्बल चाळीस टक्क्यांनी कमी करतात.

४- डायबेटिसचे रुग्ण अनेकदा हृदयविकाराला बळी पडतात आणि त्यातच त्यांचा मृत्यू होण्याचं प्रमाणही जगभरात खूपच अधिक आहे. डायबेटिसवरची ही औषधं हृदयविकाराची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात कमी करतात. एवढंच नाही, हार्ट अटॅकची शक्यताही त्यामुळे १४ टक्क्यांनी कमी होते.

 

‘इनवोकाना’ या बॅ्रंडनेमखाली विकल्या जाणाऱ्या डायबेटिसच्या औषधांमुळे हार्ट अटॅकची शक्यता तीस टक्क्यांनी कमी होते असंही संशोधकांना आढळून आलं.

‘आम तो आम, गुठलीयों के भी दाम’ ज्याला म्हणतात ते हे!

या नव्या संशोधनानं एकाच तीरात असे अनेक पक्षी मारले आहेत.

रुग्णांसाठी ही आनंदाची आणि महत्त्वाची घटना आहेच, पण त्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्लाही या संशोधकांनी दिला आहे.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com