शनिवार २४ जून २०१७

Menu

होम >> व्यापार >> स्टोरी
अलीकडील काळात भारतात लक्षणीय वृद्धी
First Published: 21-April-2017 : 02:22:39

वॉशिंग्टन : अलीकडील काही वर्षांत भारताने लक्षणीय वृद्धी नोंदविली असल्याचे प्रशंसोद्गार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने काढले आहेत. वृद्धी गतिमान झाल्यामुळे सरकारच्या कराधार वाढविण्याचा प्रयत्नांना मार्ग मोकळा झाला आहे, असेही नाणेनिधीने म्हटले आहे.

नाणेनिधीचे वित्तीय व्यवहार विभाग संचालक विटोर गास्पर यांनी सांगितले की, अलीकडील काळात भारताने खरोखरच लक्षणीय वृद्धीची नोंद केली आहे. आमचे असे मानणे आहे की, भारताने इंधन सबसिडी रद्द करणे तसेच सामाजिक लाभाचे उद्दिष्ट प्राप्त करणे या कामात प्रगती केली. केंद्रीय अर्थसंकल्पात वित्तीय तूट ३.५ टक्क्यांपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट ठरविणे त्यामुळे सरकारला शक्य झाले.

गास्पर यांनी म्हटले की, आम्ही वित्तीय क्षेत्रातील विविध बाबींवर भारतीय अधिकाऱ्यांशी काम करीत आहोत. खर्च व्यवहार्य करण्यासह वित्तीय रचनात्मक उपाययोजना, पायाभूत गुंतवणूक सुरक्षित करणे आणि कर आधार वाढविणे याचा त्यात समावेश आहे. या दृष्टीने वस्तू व सेवा करव्यवस्था आणण्यासाठी सरकारने टाकलेले पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातून भारतात खरोखरच एकल राष्ट्रीय बाजारपेठ तयार होईल. कराधार वाढविणे, उत्पन्न वाढविणे आणि उत्पन्नात समानता आणणे या मुद्यांच्या बाबतीत अजून खूप काम व्हावयाचे आहे. 

गास्पर यांनी म्हटले की, भारत आणि चीनमध्ये असमानता वाढल्याचे दिसून येत आहे. या दृष्टीने चीनमध्ये सामाजिक खर्चात वाढ करण्याची तसेच करसुधारणा लागू करण्याची गरज आहे. या क्षेत्रात काम होत आहे. १९८0 च्या दशकापासून एक अब्जापेक्षा जास्त लोकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढण्यात भारत आणि चीनला यश आले आहे. मात्र, हे होत असतानाच दुसऱ्या बाजूने उत्पन्नातील असमानता वाढली आहे.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com