शनिवार २४ जून २०१७

Menu

होम >> व्यापार >> स्टोरी
पीएफच्या ८.६५ टक्के व्याजदरास अर्थ खात्याची मंजुरी
First Published: 21-April-2017 : 02:17:14

नवी दिल्ली : २0१६-१७ या वित्त वर्षासाठी ईपीएफ ठेवींवर ८.६५ टक्के व्याज देण्याच्या प्रस्तावास वित्त मंत्रालयाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिली.

दत्तात्रय यांनी एका निवेदनात म्हटले की, ईपीएफवर ८.६५ टक्के व्याजदरास वित्त मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. आता त्यासंबंधीचे

पत्र येईल. औपचारिक चर्चा संपली आहे.

या व्याजदरास ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाने डिसेंबरमध्ये मंजुरी दिली होती. तथापि, सरकारकडून त्याला हिरवा कंदील मिळतो की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र, वित्त मंत्रालयाने ही मंजुरी दिल्याने आता याबाबतची अनिश्चितता संपली आहे. देशभरात ईपीएफओचे ४ कोटी सदस्य आहेत. या सर्व सदस्यांना याचा लाभ होणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com