माहीर - जेम्स अँण्ड ज्वेलरी

By admin | Published: May 14, 2014 02:32 PM2014-05-14T14:32:11+5:302014-05-14T14:32:11+5:30

जान्हवीच्या गळ्यातलं मंगळसूत्र किती पॉप्युलर आहे. तमाम तरुण मुली तसलं मंगळसूत्र (सोन्याचं नाही तर) खोटं तरी घ्यायला उत्सुक दिसतात.

MAIR - James and Jewelery | माहीर - जेम्स अँण्ड ज्वेलरी

माहीर - जेम्स अँण्ड ज्वेलरी

Next
>जान्हवीच्या गळ्यातलं मंगळसूत्र किती पॉप्युलर आहे. तमाम तरुण मुली तसलं मंगळसूत्र (सोन्याचं नाही तर) खोटं तरी घ्यायला उत्सुक दिसतात. इमिटेशन ज्वेलरी, बीड्स, वुडन, ट्रायबल असं काय काय बाजारात उपलब्ध असतं.
पण यासार्‍या पलीकडे आहे एक जेम्स आणि ज्वेलरीचा खास उद्योग. जो हिर्‍यांनी चमचमतो, खर्‍या मोत्यांनी, पोवळ्यांनी, पाचूंनी सजलेला आहे. सोन्या-चांदीनं चकचकणार्‍या या उद्योगात भारताची शान आहे. आजही भारतीय डायमण्ड कटर्सचा, क्राफ्टमनचा एक्सलन्स जगभर वाखाणला जातो. हिरे कापणं, त्याला पैलू पाडणं, त्यांचे दागिने बनवणं हे वाटतं तितकं सोपं काम नाही. कोट्यवधींचे हिरे लीलया पैलू पाडत दागिने बनवणार्‍या हुनरबाजांचं जगच वेगळं आहे. विशेष म्हणजे हे जग मोठं होतं आहे. जेम्स अँण्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलनुसार येत्या वर्षातच या उद्योगाला वाढीच्या अनेक संधी आहेत. विशेषत: भारतीय बनावटीच्या चांदीच्या दागिन्यांना जगभरात मोठी मागणी असेल. आजच्या घडीला १७00 कोटी रुपयांचे दागिने जगभर निर्यात होतात. त्यात मोती, खडे, सोने-हिरे, चांदी यांच्या दागिन्यांचा समावेश असतो. भारतात सूरत-मुंबई आणि जयपूर ही तीन शहरं या उद्योगाची मुख्य केंद्रे आहेत. विशेषत: जयपूरला दागिन्यांचं एक वेगळंच जग आहे. भारत सरकारही या क्षेत्रात निर्यात वाढावी म्हणून जोरदार प्रयत्न करत आहेत. मात्र हा उद्योग वाढायचा तर दागिने घडवण्यात माहीर असलेलं कुशल मनुष्यबळ या क्षेत्राला लागणार आहे.
 
ज्वेलरी फॅब्रिकेशन 
नाव इंग्रजी असलं तरी बिचकायला नको, दागिने घडवणं असा त्याचा साधा सोपा अर्थ. दागिने घडवणार्‍या स्किल्ड कारागिरांची या क्षेत्रात मोठी मागणी आहे. जितकं काम अवघड, नाजूक, नजाकतीचं तितके  पैसे जास्त. हा साधा नियम.
 
पॉलिशिंग/ कटिंग
हिर्‍यांना पॉलिश करणारे, हिरे कापणारे, त्याला दागिन्याच्या आकारानुसार कापून त्या योग्य मापात तासणारे खास कारागीर असतात. त्याचं प्रशिक्षणही असतं. या निष्णात कारागिरांची सध्या या मार्केटमध्ये खास स्कोप आहे.

Web Title: MAIR - James and Jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.