सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> ऑक्सिजन >> स्टोरी
सुश्मिताचा बिनामेकअप फोटो आणि आॅनेस्टी नावाचा ट्रेण्ड
First Published: 12-July-2017 : 15:53:00

 

- निशांत महाजन

सुश्मिता सेननं मेकअप नसलेला फोटो इन्स्टाग्रामवर काय टाकला त्याची नेटिझन्समध्ये प्रचंड चर्चा झाली. इतकी चर्चा की, सुश्मिता कुठला व्यायाम करते, कुठली क्रीम लावते, काय डाएट करते वगैरे. का? तर तिनं मेकअप न केलेला आपला फोटो समाजमाध्यमांत टाकला. आणि त्यात ती अप्रतिम सुंदर दिसत होती. खरंतर रजनीकांत मेकअप न करता मस्त राजरोस फिरतात. आणि तरी त्यांचे फॅन्स त्यांच्या त्याही रूपावर जीव ओवाळून टाकतात. तर मग सुश्मिताच्या याच फोटोची एवढी चर्चा होण्याचं काय कारण असेल? त्याचं कारण आहे सोशल मीडियावरचा नवा आॅनेस्टी नावाचा ट्रेण्ड.

खरं तर सोशल मीडियात कधी काय क्लिक होईल आणि कशाची हवा होईल हे सांगताच येत नाही. पण गेले काही दिवस सोशल मीडियात एक नवा ट्रेण्ड आहे.

त्याचं नाव आहे आॅनेस्टी इज ट्रेण्डिंग.

म्हणजे काय तर जे जे खरं वाटेल, खरं असेल, प्रामाणिकपणे कबूल केलेलं असेल, पर्सनली खरंखुरं, बरंवाईट मांडलेलं असेल ते ट्रेण्ड होतं.

तुम्ही साधं उदाहरण घ्या. 

आपल्या एखाद्या मित्रानं सेण्टी होत सांगितलेला त्याचा खराखुरा किस्सा आपण चवीनं वाचतो. कुणाची लाइफस्टोरी, कुणाचा स्ट्रगल, कुणाचा कॅमेराला पोज न देता काढलेला फोटो, एखाद्यानं पोज न घेता शेअर केलेला अनुभव, कुणाची तरी उत्स्फूर्त कमेण्ट हे सारं आपण फार मन लावून वाचतो.

आपण म्हणजे आपण सगळेच. 

जे जे दिलसे लिहिलेलं, व्यक्त केलेलं, फोटो काढून मांडलेलं असेल ते आताशा सोशल मीडियात क्लिक होताना दिसतं आहे. कारण तेच, तिथं चकाकणारे फोटो, कचकडी उसन्या शब्दांचे रतीब रोजच चालू असतात. त्या उसन्या शब्दांना आणि खोट्या उमाळ्यांना कुणी विचारत नाही. कारण त्यातलं फोफसेपण सगळ्यांनाच कळून चुकलंय. 

त्यापेक्षा जे जसं आहे तसं पाहणं, स्वीकारणं आणि त्यातलं अस्सल असणं, रॉ असणं अधिक आकर्षक वाटू लागलं आहे.

सुश्मिताचा बिनामेकअप फोटो कसला भारी आहे हे सांगताना आपल्याला हे माहिती असलेलं बरं!

 

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com