मंगळवार २५ जुलै २०१७

Menu

होम >> ऑक्सिजन >> स्टोरी
काय करत असेल आई आत्ता?
First Published: 10-May-2017 : 15:47:58
Last Updated at: 10-May-2017 : 16:04:26

 - प्रसाद सांडभोर

या घराजवळ ही बाग नसती तर काय बरं केलं असतं मी? सकाळी सकाळी हुक्की आली म्हणून जॉगिंग करायला कुठे गेलो असतो? किंवा संध्याकाळी कधी असा नुसताच निवांत वेळ घालवावासा वाटल्यावर कुठे बरं जाऊन बसलो असतो?

एरवी इतकी गर्दी नसते इथे. मुलांच्या एखाद-दोन टोळ्या लपाछपी नाहीतर पकडापकडी खेळत असतात. तिकडे कोपऱ्यात एक हास्यक्लब भरतो. इकडे बाकड्यांवर बसून काहीजण गप्पा मारत असतात. कधी शेजारी बसलेल्यांशी, तर कधी फोनवरून दूरच्या कोणाशी. आज मात्र रविवार. सुट्टीची संध्याकाळ. बाग अगदी भरून गेलीये!

हे समोरचं मित्रमंडळ बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटलंय वाटतं. ग्रुपचा सेल्फी काढण्यात गुंग आहेत सगळे. तिकडे मागे कारंज्याशेजारी एक काकू आणि छोटू मुलगी कॅच कॅच खेळतायत. अरे! पाण्यात गेला बॉल! हा हा! छान निमित्त मिळालं दोघींना कारंज्याच्या तळ्यात उतरून पाणी खेळायचं!

या गुलमोहराखाली तर मस्त पिकनिकच चालू आहे! चटई, डबे, ताटल्या, पाणी, पत्ते, फ्रीसबी. सगळं सगळं घेऊन आली आहेत ही मंडळी. चटईवर पेपर अंथरतायत ते बाबा असावेत आणि भेळ वाढण्याचं काम करतेय ती आई असावी. गुलमोहराच्या शेंगांच्या तलवारींनी लढाई खेळतायत ती मुलं असणार. हो, नक्कीच. आईनं बोलावलं तसे पळत पळत चटईवर येऊन बसले तिघेही.

‘‘त्या काटक्या बाजूला ठेवा जरा. आधी खाऊन घ्या’’, आई असं म्हणतेय. 

‘‘दादाला इतकी जास्त भेळ आणि मला इतकी कमी? मलापण अजून हवी..’’ छोटू खोटं खोटं चिडून बोलतोय.

‘‘आधी दिलीय तेवढी संपव पाहू तू, मग अजून घे’’, बाबा म्हणाले.

आह! आणि आलीच ‘ती’वाली फीलिंग. असलं काही पाहिलं की घरची आठवण येणार म्हणजे येणारच. काय बरं करत असेल आई आत्ता? करूयात घरी फोन?

‘‘हॅलो आई’’

‘‘अरे वाह! आज आत्ता कसा काय बरं फोन? बोला, सब ठीक?’’

 

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!



महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com