मोहम्मद शमीच्या धर्माचा उल्लेख करणं शोएब मलिकला पडल महागात

By admin | Published: May 28, 2017 11:38 AM2017-05-28T11:38:52+5:302017-05-28T11:41:49+5:30

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या धर्माचा उल्लेख करणं पाकिस्तानच्या शोएब मलिकला चागंलच महागात पडले आहे.

Shoaib Malik falls in the glory of mentioning Mohammad Shami's religion | मोहम्मद शमीच्या धर्माचा उल्लेख करणं शोएब मलिकला पडल महागात

मोहम्मद शमीच्या धर्माचा उल्लेख करणं शोएब मलिकला पडल महागात

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या धर्माचा उल्लेख करणं पाकिस्तानच्या शोएब मलिकला चागंलच महागात पडले आहे. ट्विटरकरांनी मोहम्मद शमीच्या धर्माचा उल्लेख केल्यावरून चांगलच फटकारलं आहे. करायला गेलो एक आणि झालं भलतंच, अशीच काहीशी गत शोएब मलिकसोबत झाली म्हणावी लागेल. आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना एका प्रश्नाच्या उत्तरात शोएब मलिकने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या धर्माचा उल्लेख केला. आणि ट्विटरकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले
भारतीय संघातील तुझा आवडता गोलंदाज कोण? असा प्रश्न एकाने मलिकला विचारला. त्यावर मलिकने मोहम्मद शमीचं नाव घेतलं. भारतीय संघातील मोहम्मद शमी हा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. तो मुस्लिम आहे म्हणून मी त्याचं नाव घेतोय असं नाही, पण तो खरंच खूप चांगला गोलंदाज आहे. त्याच्या विरुद्ध फलंदाजी करणं मला कठीण जातं., असं शोएब मलिक म्हणाला. यावर ट्विटरकरांनी शोएब मलिकने शमीच्या धर्माचा येथे उल्लेख करण्याची काहीच गरज नव्हती असं मत नोंदवलं.
तुमचा आवडत्या खेळाडूबद्दल माहिती देताना त्याच्या धर्माचा उल्लेख करणं महत्त्वाचं नव्हतं, असं एका ट्विटरकराने म्हटलं आहे. तर एकाने शमी मुस्लिम नसून भारतीय आहे, असं राहुल सिन्हा याने सुनावलं आहे. शमीची माहिती देताना त्याच्या धर्माबद्दल उल्लेख करण्याची गरजच काय? असा सवाल ट्विटरकरांनी मलिकला यावेळी विचारला.

Web Title: Shoaib Malik falls in the glory of mentioning Mohammad Shami's religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.