सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> आंतरराष्ट्रीय >> स्टोरी
तिबेटमध्ये चिनी सैनिकांनी केला युद्धसराव
First Published: 17-July-2017 : 12:03:28
Last Updated at: 17-July-2017 : 12:04:52
ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 17 - चीनमधील लष्कर जवानांनी तिबेटमध्ये फायरिंगचा सराव अभ्यास केला आहे. सध्या भारत आणि चीनमध्ये तणाव सुरु असून याच पार्श्वभुमीवर चीनच्या लष्कराने हा सराव केल्याची माहिती मिळत आहे. डोकलाममध्ये भारतीय सैन्यांनी तळ ठोकला असल्याने चीनचा तिळपापड झाला असून त्यांच्याकडून अनेक दावे केले जात आहेत. चीन डोकलाममध्ये रस्ता बांधण्याचा प्रयत्न करत असून भारताने याला विरोध केला आहे. हा रस्ता बांधला गेल्यास सिक्कीमसहित तिबेट आणि भूतानशी जोडला जाईल ज्यामुळे भारताला धोका वाढतो. 
 
संबंधित बातम्या
चीनचा सामना करण्यासाठी भारत तयार करतोय खास मिसाईल
पाकिस्तान आण्विक हल्ल्याचा मूर्खपणा करणार नाही
...तर भारतावर आण्विक हल्ला करू- संरक्षण मंत्री,पाकिस्तान
 
शुक्रवारी चीनच्या सरकारी चॅनेल सीसीटीव्हीने (China Central Television) माहिती दिली की, पिपल्स लिबरेशन आर्मीने दक्षिण - पश्चिम चीनकडील तिबेट स्वयंशासित क्षेत्रात फायरिंगचा अभ्यास केला. यावेळी लष्कराने नेमका किती वाजता हा सराव केला याची माहिती देण्यात आली नाही. 
 
तिढा वाढला! भारतापाठोपाठ चीननेही डोकलाममध्ये ठोकले तंबू
 
ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या सरावात पिपल्स लिबरेशन आर्मीच्या तिबेट मिलिट्री कमांड आणि चीनच्या पठार डोंगराळ भागात तैनात असणा-या ब्रिगेडने भाग घेतला. पिपल्स लिबरेशन आर्मी तिबेटमधील भारत - चीन सीमारेषेवर तैनात असते. तिबेटला जोडण-या डोंगराळ भागांमध्ये हे सैन्य तैनात असतं. सीसीटीव्ही वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, हे सैन्य गेल्या खूप दिवसांपासून ब्रम्हपुत्र नदीच्या मध्य आणि खालील भागात तैनात आहे. 
 
चीनी सैनिकांनी केलेल्या सराव अभ्यासात हल्ल्यादरम्यान कशाप्रकारे इतर तुकड्या एकत्रित येऊन उत्तर देतील याचा अभ्यास करण्यात आला. यासंबंधीचा एक व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट करण्यात आला आहे ज्यामध्ये ग्रेनेड आणि मिसाईलचा वापर करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं.
 
या व्हिडीओमध्ये कशाप्रकारे रडार युनिटच्या सहाय्याने शत्रुच्या विमानाचा पत्ता लावला जाऊ शकतो, आणि सैनिक ते नेस्तनाभूत करु शकतात हेदेखील दाखवण्यात आलं. जवळपास 11 तासाहून जास्त वेळ हा सराव अभ्यास चालू होता. 
 
...नाहीतर काश्मीरमध्ये सैन्य घुसवू, चीनचा भारताला इशारा
 
जो तर्क लावत भारतीय सैन्यांनी चीन आणि भूतानमधील वादग्रस्त जमिनीवर पाय ठेवला आहे, त्याच तर्काच्या आधारे आम्ही काश्मीरमध्ये घुसू असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे. 
 
'जरी भूतानने आपल्या जमिनीच्या संरक्षणासाठी भारताची मदत मागितली असली, तरी ती मर्यादित असली पाहिजे. वादग्रस्त जमिनीवर पाय ठेवायची गरज नाही', असं चीनच्या वेस्ट नॉर्मल यूनिव्हर्सिटीमधील भारताच्या अध्ययन विभागाचे प्राध्यापक आणि व्यवस्थापक लॉन्ग शिंगचून बोलले होते. 'नाहीतर याच तर्काच्या आधारे जर पाकिस्तान सरकारने आम्हाला विनंती केली तर दिस-या देशाचं सैन्य भारत आणि पाकिस्तानमधील वादग्रस्त जमिनीवर पाय ठेवेल. यामध्ये भारत नियंत्रित काश्मीरचाही समावेश असेल' असा धमकीवजा इशारा देण्यात आला होता. 
 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com