मंगळवार २५ जुलै २०१७

Menu

होम >> आंतरराष्ट्रीय >> स्टोरी
भारताकडे 2600 अणवस्त्रे बनवण्याची क्षमता - पाकिस्तान
First Published: 19-May-2017 : 11:43:53

 ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 19 - कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून सणसणीत चपराक मिळालेल्या पाकिस्तानने आता अणवस्त्र कार्यक्रमांवरुन भारतावर आरोप केला आहे. जगामध्ये भारताचा अणवस्त्र कार्यक्रम वेगाने विकसित होत असून, भारताकडे 2600 अणवस्त्रांची निर्मिती करण्याची क्षमता आहे असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नाफीस झाकारीया म्हणाले. 
 
इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. भारताच्या अणवस्त्र संपन्नतेच्या महत्वकांक्षेमुळे दक्षिण आशियाच्या स्थैर्याला धोका असल्याचे त्यांनी सांगितले. भारताला नागरी अणूऊर्जा कार्यक्रमातंर्गत अणू इंधन, उपकरणे आणि जे तंत्रज्ञान मिळतेय त्याचा गैरवापर होण्याची भिती पाकिस्तानने व्यक्त केली आहे. भारताला अणू पुरवठादर देश एनएसजी गटाचे कायमस्वरुपी सदस्यत्व हवे आहे त्यावरही पाकिस्तानला आक्षेप आहे. 
 
एलिट गटामध्ये भारताला सदस्यत्व दिल्यामुळे जे धोके निर्माण होऊ शकतात त्याचा जागतिक समुदायाने विचार करावा असे नाफीस झाकारीया म्हणाले. काही दिवसांपूर्वी भारताने अणवस्त्रांचा पहिला वापर न करण्याच्या आपल्या धोरणाचा फेरविचार करण्याचे संकेत दिले होते. पाकिस्तानकडून वापर होऊ शकतो असे वाटले तर, भारतच पहिला अणवस्त्रांचा वापर करेल असे संकेत भारताने दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तानने आता अशा स्वरुपाचे विधान केले आहे. 
 
वास्तवात पाकिस्ताननेच अणवस्त्रांच्या निर्मितीवर सर्वाधिक भर दिल्याचे अनेकदा समोर आले आहे.  अमेरिकेतील अनेक संस्थांनी पाकिस्तानच्या अणवस्त्र कार्यक्रमाचे अहवाल प्रसिद्ध करुन पाकिस्तानच्या नापाक कृती जगासमोर आणल्या आहेत.
 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com