सोमवार २६ जून २०१७

Menu

होम >> आंतरराष्ट्रीय >> स्टोरी
विश्वासघातकी प्रियकराला असा शिकवला धडा
First Published: 21-March-2017 : 00:51:33

मेलबर्न : खरे प्रेम भाग्यशाली लोकांनाच मिळते, पण कोणी तुम्हाला प्रेमात धोका दिला, तर तुम्ही काय कराल? काही लोक प्रेमात ठेच बसल्यानंतर जोडीदारापासून वेगळे होऊन नव्याने जीवन सुरू करतात... काही पुन्हा उठू शकत नाहीत, तर काही सुडाने पेटून उठतात.

मेलबर्नमधील २६ वर्षांच्या हीदी रुहोनेन हिलाही तिच्या प्रियकराने धोका दिला होता. विश्वासघातकी प्रियकराला धडा शिकविण्यासाठी हीदीने जे केले, ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. मेलबर्न विद्यापीठात शिकणाऱ्या हीदीचे एका तरुणाशी दीर्घ काळापासून प्रेमसंबंध होते. मात्र, हीदीचा प्रियकर तिला फसवत होता. प्रेमात आकंठ बुडालेल्या हीदीला याची कल्पनाही नव्हती. म्हणतात सत्य कधी ना कधी उघड होते. हीदीला प्रियकर आपल्याला फसवत असल्याचे एकदिवस कळले. त्याचा धक्का बसून ती कोलमडली. मात्र, खचली नाही. तिने प्रियकराला धडा शिकविण्याचे मनोमन ठरविले.

हीदीने प्रियकराशी संबंधित सर्व आठवणींची विक्री केली. प्रियकराने दिलेले कपडे, बूट, व्हिडीओ गेम, चित्रपट, पुस्तके आणि स्पीकर यासारख्या वस्तूंचा आपल्या गॅरेजमध्ये सेल लावून त्यांची विक्री केली. यातून मिळालेल्या पैशाने आपण सहलीवर जाणार आहोत, असे हीदीने सांगितले.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com