सोमवार २६ जून २०१७

Menu

होम >> जरा हटके >> स्टोरी
अनेकदा महिलांना आपल्या प्रेमाचा त्याग करावा लागतो - सर्वोच्च न्यायालय
First Published: 19-June-2017 : 08:06:08
Last Updated at: 19-June-2017 : 08:08:07
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात देशामधील अपयथी प्रेम प्रकरणांचा उल्लेख केला आहे. आई - वडिलांसाठी महिलांनी आपल्या प्रेमाचा त्याग करणं देशामध्ये सामान्य गोष्ट झाली आहे. न्यायालयात एका प्रेम प्रकरणावर सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान हे मत मांडण्यात आलं. एका व्यक्तीने महिलेसोबत प्रेमप्रकरणांनंतर लपून छपून लग्न केलं होतं, यानंतर दोघांनी मिळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. 1995 मधील या घटनेत 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला, मात्र ही व्यक्ती वाचली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात तरुणीच्या हत्येचा आरोप लावला होता. मात्र न्यायालयाने त्याच्यावरील आरोप हटवत आजन्म कारावासाची शिक्षा रद्द केली. 
 
न्यायालयाने सांगितलं की, 'महिलेने आधी आपल्या आई - वडिलांच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा निर्णय घेतला असावा, मात्र नंतर तिने आपला विचार बदलला असल्याची शक्यता आहे. घटनास्थळी आढळलेल्या बांगड्या, फुलांचा हार यावरुन तरी असंच दिसत आहे. आपल्या कुटुंबाच्या विरोधामुळे लग्न करु शकत नसल्याचं तरुणीने आपल्या प्रियकराला सांगितलं असावं'. न्यायाधीश एके सीकरी आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने सांगितलं की, 'या देशात एखाद्या तरुणीने आपल्या प्रेमाचा त्याग करणे, आणि आपल्या आई - वडिलांच्या निर्णयाचा स्विकार करणं सहज गोष्ट आहे'. 
 
न्यायालयाने सांगितलं की, 'महिला आणि आरोपी एकमेकांवर प्रेम करत होते. महिलेच्या वडिलांनी न्यायालयात जात वेगळी असल्याने लग्नाला विरोध होता असं मान्य केलं आहे'. कनिष्ठ न्यायालयाने महिलेच्या प्रियकराला महिलेच्या हत्येच्या आरोपाखाली दोषी सिद्ध करत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर राजस्थान न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला होता. 
 
महिलेचे नातेवाईक लग्नासाठी तयार नसल्याने आम्ही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचं व्यक्तीने न्यायालयात सांगितलं होतं. दोघांनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याच्या विषाचं प्रमाण कमी होतं. महिलेची प्रकृती बिघडू लागल्यानंतर त्याने इमारतीबाहेर धाव घेत मदत मागितली. मात्र परतल्यानंतर पाहिलं तर तिने गळफास लावला होता. यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यत तिचा मृत्यू झाला होता. 
 
सर्वोच्च न्यायालयाने त्याने दिलेला जबाब ग्राह्य धरत, त्यावर विश्वास ठेवला. न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली आहे. 
 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com