सोमवार २६ जून २०१७

Menu

होम >> जरा हटके >> स्टोरी
'ती'च्या मुळेच भारताचा पराभव
First Published: 19-June-2017 : 06:42:54

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 19 - विराट कोहलीची टीम इंडियाच जिंकणार, हे अवघे जग ओरडून सांगत असताना पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव केला. आतापर्यंत तलवारीसारख्या तळपणाऱ्या भारतीय फलंदाजांची कामगिरी पाकपेक्षा सरस ठरेल असेच वाटले होते. विराट कोहलीसह त्याचे शेरही ढेर झाले. त्यानंतर या पराभवाची कारणे काय आहेत हे अनेकजण शोधत आहेत. मात्र आम्हाला एक कारण सापडले आहे. पराभवाचे हे ठोस कारण असू शकते अशी शक्यता किंवा निवळ योगागोग ही असू शकतो. सोशल मीडियावर याबाबत खमंग चर्चाही सुरु आहेत. भारताच्या पराभवाचे कारण आहे पाकिस्तानी पत्रकार...तुम्हाला यावर विश्वास बसला नाही ना..पण पाकिस्तानी क्रीडा पत्रकार झैनाब अब्बास ने ज्या कर्णधारासोबत सेल्फी घेतला आहे तो संघ सामना हरल्याचा अजब योगायोग या स्पर्धेत दिसून आला आहे. सध्या विराट कोहली आनी त्या पत्रकाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

झैनाबसोबत ज्या टीमचा प्लेअर किंवा कर्णधार सेल्फी काढतो ती टीम हरते अशी एक सुरस कथा सोशल मीडियावर सध्या ट्रेंड होते आहे. यामधली सत्यता पडताळून पहावी लागेल. पण आश्चर्याची बाब म्हणजे झैनाबने ज्या खेळाडूंसोबत फोटो काढले आहेत, ते खेळाडू एकतर शून्यावर बाद झालेत किंवा त्यांना मोठी खेळी करता आली नाही. तसेच पाकिस्तानसोबत सामना असताना झैनाबने प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत सेल्फी काढला तो संघ हरला आहे. आजही तसेच घडले. युवराज सिंग आणि विराट कोहलीसोबत झैनाबने सेल्फी काढला. आता हे दोन सेल्फीच टीम इंडियाच्या पराभवाचे कारण असल्याचे सोशल मीडियावर चर्चा आहे.

लॉडर्स मैदानावर पाकिस्तानी फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई करून 339 धावांचे तगडे आव्हान उभे केले होते.

भारताचा डाव सुरू झाला तेव्हा एक-एक खेळाडू पटापट बाद होत तंबूत परतताना दिसले. कागदावर बलाढ्य भासणारे भारतीय फलंदाज मोक्याच्या क्षणी ढेपाळले आणि रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाकडून भारताला 180 धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. या दारूण पराभवाला झैनाबसोबत काढलेला सेल्फी कारणीभूत होता असा एक विषय आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तसेच झैनाबने युवराज आणि विराटसोबत काढलेले सेल्फीही व्हायरल होत आहेत. त्यामुळे झैनाब ही तिच्या पत्रकारीतेपेक्षा तिच्या सोबत खेळाडूंनी काढलेल्या सेल्फीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com