सुप्रिया सुळेंच्या सोयीसाठी धनगर आरक्षणाची खेळी

By Admin | Published: August 18, 2014 04:16 AM2014-08-18T04:16:30+5:302014-08-18T04:16:30+5:30

त्यामुळे धनगर समाजाला जवळ करण्यासाठी अनुसूचित जमातीतील समावेशाची खेळी करण्यात आली. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना सविस्तर पत्र पाठविल्याचे ते म्हणाले.

For the convenience of Supriya Sule, Dhangar has a reservation | सुप्रिया सुळेंच्या सोयीसाठी धनगर आरक्षणाची खेळी

सुप्रिया सुळेंच्या सोयीसाठी धनगर आरक्षणाची खेळी

googlenewsNext

मुंबई : बारामतीत सुप्रिया सुळेंच्या कायमस्वरुपी राजकीय सोयीसाठीच शरद पवार यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी केला आहे.
टिळक भवनात पत्रकारांशी बोलताना पुरके म्हणाले की, धनगर समाजाची एकगठ्ठा मते दुरावल्याने लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचे मताधिक्क्य घटले. त्यामुळे धनगर समाजाला जवळ करण्यासाठी अनुसूचित जमातीतील समावेशाची खेळी करण्यात आली. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना सविस्तर पत्र पाठविल्याचे ते म्हणाले.
धनगर समाजाला सध्या साडेतीन टक्के इतका आरक्षणाचा लाभ मिळतो. धनगड ही जमात वेगळी असून त्याचा धनगर समाजाशी काहीसी संबंध नाही. कोणत्याही निकषाप्रमाणे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश शक्य नाही. आदिवासी समाजाचे उपद्रव मुल्य कमी असल्यानेच अनेक जाती स्वत:चा समावेश या प्रवर्गात करण्याचा आग्रह धरतात, असा आरोपही त्यांनी केला. शरद पवारानी मतांच्या राजकारणासाठी असे करू नये असे आवाहानही त्यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: For the convenience of Supriya Sule, Dhangar has a reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.