सोमवार २६ जून २०१७

Menu

होम >> मनोरंजन >> स्टोरी
शाहीदच्या पत्नीबाबत तिच्या वर्गमित्रानंच केले खळबळजनक खुलासे
First Published: 20-March-2017 : 18:18:54
Last Updated at: 20-March-2017 : 18:19:20

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 20 - अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत हिने गेल्या काही दिवसांपूर्वीच महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यानंतर तिच्यावर सोशल मीडियावरून टीकेची झोडही उठवण्यात आली होती. काम करणा-या महिलांना मुलांपेक्षा स्वत:चे करिअर महत्त्वाचे वाटते. फक्त काही तास मुलीसोबत घालवून मला कामासाठी घराबाहेर जायचे नाहीये. जर असंच करायचे असते तर मला तिची गरजच काय होती? मिशा काही कुत्र्याचे पिल्लू नाही. मला तिला मोठे होताना पाहायचे आहे, असे मीरानं मुलाखतीदरम्यान खळबळजनक वक्तव्यं केली होती. अनेकांनी या वक्तव्यांवरून मीराला चांगलेच धारेवर धरले होते. मीराच्या बेताल विधानांनंतर अनेक काम करणा-या महिलांनी तिच्या नावे खुले पत्र लिहिले. इतकंच नव्हे तर मीराच्या एका वर्गमित्रानेसुद्धा तिला अशाच पद्धतीचे पत्र पाठवले. त्यात त्याने मीराबाबत खळबळजनक खुलासे केले आहेत.

वर्गमित्र पत्रात लिहितो, डीयर मीरा, तुझी मुलाखत पाहिली. तुझे विचार ऐकून खरच दु:ख झाले. आपण तीन वर्षे एकाच कॉलेजात आणि एकाच वर्गात होतो. मी दाव्यानिशी सांगतो की, तुझे फेमिनिज्मबद्दलचे विधान केवळ एक देखावा आहे. मीरा, कॉलेजमध्ये तू आणि तुझ्या मैत्रिणी बाकी मुलींना त्यांचे कपडे आणि स्कीनवरूनच जज करायचीस. ज्या मुली तुझ्या नजरेत फॅशनमध्ये कमी पडायच्या, त्यांच्याकडे तू ज्या पद्धतीनं तुच्छतेने पाहायचीत, त्यावरून तुझे विचार किती संकुचित आहेत, हेच दिसले आणि हो, काम करणा-या महिलांबद्दल तू जे काही बोललीस, ते कधीही विसरता येण्यासारखे नाही.

तुझे हे विधान महिलांच्या सद्यस्थितीतील सक्षमीकरण्याच्या युगात विदारक आहे. कॉलेजातील मुलींचे कपडे आणि फिटनेस पाहूनच तू मुलींबद्दल मतं बनवायचीस. मुलींचे कपडे आणि त्यांचे सौंदर्य याच आधारावर तू प्रत्येक मुलीला जज करायची, असे मीराच्या या वर्गमित्राने म्हटले आहे. या वर्गमित्राने मीरा उद्देशून लिहिलेल्या पत्रात खळबळजनक खुलासे केले आहेत.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com