रविवार २६ मार्च २०१७

Menu

close
This ad will auto close in 10 seconds
होम >> मनोरंजन >> स्टोरी
...हे आहे सिद्धार्थ आणि तृप्तीच्या नात्याचे गुपित
First Published: 20-March-2017 : 01:47:17
Last Updated at: 20-March-2017 : 06:56:44

नाटक असो वा सिनेमा, प्रत्येक क्षेत्रात त्यांने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. जत्रा, दे धक्का, उलाढाल यासारखे चित्रपट असो किंवा मग जागो मोहन प्यारे, लोच्या झाला रे यासारखी नाटकं असो, प्रत्येक भूमिकेत सिद्धार्थने आपली एक वेगळी छाप सोडली आहे. लवकरच सिद्धार्थ त्याच्या खऱ्या आयुष्यातल्या बलियेबरोबर आपल्यासमोर येणार आहे. सिद्धार्थ आणि तृप्तीची जोडी आपल्याला ‘नच बलिये 8’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. त्यानिमित्त त्याने त्यांच्या दोघांशी मारलेल्या या खास गप्पा...

तुला नच बलिया सीझन 8मध्ये एंट्री घेताना कसे वाटते आहे?

खूप एक्सायटेड आहे मी. याआधीही मला ‘नच...’साठी आॅफर आली होती, मात्र त्या वेळी तारखेमुळे ते शक्य झाले नव्हते. याही वेळी माझं एका चित्रपटाचे शूटिंग होणार होतं अमेरिकेत मात्र ते रद्द झाल्यामुळे मी या पर्वात सहभागी होतो आहे. या शोमध्ये सहभागी होण्यामागचे मुख्य कारण तृप्ती होते. माझ्या बलियेसाठी मी या शोमध्ये सहभागी झालो आहे. खूप एन्जॉय करतोय सगळ्या गोष्टी. ‘नच...’च्या निमित्ताने मला तृप्तीबरोबर वेळ घालवायला मिळतो आहे.

याआधीच्या दोन मराठमोळ्या जोड्या हे पर्व जिंकल्या आहेत, त्याबद्दल काय सांगशील?

दडपण अजिबात नाहीय. आधीच्या जोड्या फारच ग्रेट होत्या. आम्हीही आमच्या पद्धतीने हे पर्व जिंकण्यासाठी मेहनत नक्की करणार आहोत. मात्र त्यापेक्षाही आम्ही हा प्रवास एकमेकांची कंपनी जास्त एन्जॉय करतोय.

तू टीव्ही आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात काम केले आहेस, त्यामुळे तुला काय फरक जाणवतो?

मी सुरुवातीच्या काळात टीव्हीवर काम केले. त्यानतंर मात्र मी चित्रपट आणि नाटकांमध्ये जास्त रमलो. मात्र एखादा अँकर बेस शो मला करायला नक्कीच आवडेल. ज्यात प्रेक्षक मला सिद्धार्थ जाधव म्हणून बघू शकतील.

तुझ्या आगामी प्रोजेक्टविषयी काय सांगशील?

माझ्या ‘माणूस : एक माती’ नावाचा चित्रपट येतोय. यात बाप-लेकाच्या नात्यावर भाष्य करण्यात आले आहे. आणि ‘गेला उडत’ या नाटकाचे माझे प्रयोग चालूच आहेत आणि आता सध्या ‘नच...’मध्ये बिझी आहे.

सिद्धार्थ जाधवचा ड्रीम रोल कोणता?

मला कधीच वाटले नव्हते मी आयुष्यात कधी हिरो बनेन. त्यामुळे ड्रीम रोल असा माझा कोणताच नाही. प्रत्येक रोल हा माझ्यासाठी ड्रीम रोलच होता. ‘जत्रा’मधला सिद्ध असो, ‘इरादा पक्का’मधला रोहित किंवा ‘हुप्पा हुय्या’मधला हणम्या असो, हा प्रत्येक रोल माझ्यासाठी ड्रीम रोलच होता.

लवकरच तुमच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण होताहेत. या प्रवासाबद्दल काय सांगशील?

हा प्रवास खूपच सुंदर होता. तृप्तीमुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. तिने नेहमीच माझं घर संभाळले. माझ्या यशात सगळ्यात महत्त्वाचा वाटा तिचा आहे. तिच्या सपोर्टशिवाय इथंपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. ‘नच...’च्या आम्ही आमचा 10 वर्षांचा प्रवास पुन्हा जगतो आहे.

तृप्तीबरोबर तु पहिल्यांदा आॅनस्क्रीन येतो आहेस, याबद्दल किती एक्सायटेड आहेस?

मी खूप जास्त एक्सायटेड आहे. 6-6 तास आम्ही डान्सच्या रिहल्स करतो आहे. मी कथक शिकले आहे आणि कॉलेजमध्ये असताना अ‍ॅक्टिंगही केली आहे. मात्र कॉलेजनंतर काही केले नाही. ‘नच...’ मुळे मला ती संधी पुन्हा एकदा मिळाली आहे. मीच सिद्धूच्या या शोमध्ये सहभागी होण्यासाठी मागे लागले होते. माझी खूप इच्छा होती मी आणि सिद्धने या शोमध्ये परफॉर्म करावे.

तुझं आणि सिद्धूचं लव्ह मॅरेज आहे, त्या वेळी तुमच्या लग्नाला विरोध झाला होता घरातून?

हो, माझे कुटुंब या नात्यासाठी तयार नव्हते. घरच्यांचा विरोधात जाऊन आम्ही लग्न केले होते. त्या वेळी तो स्ट्रगलिंग अ‍ॅक्टर होता आणि मी एका चांगल्या ठिकाणी नोकरीला होते. त्यामुळे घरातून विरोध होणे हे स्वाभाविक होते. मात्र माझा सिद्धार्थवर पूर्णपणे विश्वास होता. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी येऊन माझ्या आई-वडिलांनी आमच्या नात्याला स्वीकारले आणि त्यांना सिद्धार्थचा जावई म्हणून खूप अभिमान आहे.

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS

 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com