मंगळवार २७ जून २०१७

Menu

होम >> मनोरंजन >> स्टोरी
या चित्रपटांनी केली कादंबऱ्यांची कॉपी!
First Published: 20-March-2017 : 01:43:53

उत्तम स्क्रिप्ट, कथानक, स्टारकास्ट, संगीत यांचे संपूर्ण पॅकेज म्हणजे चित्रपट. दर्जेदार चित्रपटनिर्मिती करायलाही काही काळ तपश्चर्या करावी लागते. त्यानंतरच उत्तम कलाकृतीचे फळ त्यातून मिळत असते. पण, सध्याचे वातावरण तसे नाही. अ‍ॅक्शन, रोमान्स यावर आधारित एक थीम घेऊन छोटेखानी चित्रपट बनवला जातो.

कधीकधी तर अशी वेळ येते, की निर्माता तयार असतो, पण दिग्दर्शकाकडे स्क्रिप्टच नसते. मग अशा वेळी जुन्या चित्रपटांचा रिमेक बनवणे, सिक्वेल बनवणे तसेच जुन्या कादंबऱ्यांवर चित्रपट निर्मिती करणे असे फंडे वापरले जातात. आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट असे आहेत ज्यांची निर्मिती कादंबऱ्यांची कॉपी करून करण्यात आली आहे. पाहूयात, कोणते आहेत हे चित्रपट आणि कादंबऱ्याही...

देवदास (१९३६, १९५५, २००२)

शरच्चंद्र चट्टोपाध्याय या बंगाली लेखकांनी लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘देवदास’. या कादंबरीच्या कथानकावर आधारित तीनदा चित्रपट बनवण्यात आले. १९३६मध्ये प्रथमेश बारूआ यांनी के.एल. सैगल, जमुना बारूंद, टी.आर. राजाकुमारी यांना घेऊन ‘देवदास’च्या कथानकावर आधारित चित्रपट बनवला होता. बिमल रॉय यांनी १९५५मध्ये दिलीप कुमार, वैजयंतीमालाा आणि सुचित्रा सेन यांसह चित्रपटनिर्मिती केली. तर संजय लीला भन्साळी यांच्या २००२मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरूख खान, ऐश्वर्या रॉय- बच्चन आणि माधुरी दीक्षित या त्रिकुटासह ‘देवदास’ चित्रपट बनवला.

परिणीता (१९५३, २००५)

बंगाली लेखक शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘परिणीता’ ही कादंबरी लिहिली. या कादंबरीचा बॉलिवूडमध्ये दोनदा चित्रपट बनवण्यासाठी वापर करण्यात आला. १९५३मध्ये बिमल रॉय दिग्दर्शित अशोक कुमार आणि मीना कुमारी यांच्यावर चित्रित चित्रपट रिलीज झाला. त्यानंतर प्रदीप सरकार यांचा २००५मध्ये सैफ अली खान, विद्या बालन आणि संजय दत्त यांच्यासह चित्रपट बनवला गेला.

ओमकारा (२००६)

इंग्रजी साहित्याचा देव, ग्रेट कादंबरीकार म्हणजे शेक्सपियर! याच्या अनेक कादंबऱ्यांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. त्यातली एक कादंबरी म्हणजे ‘आॅथेल्लो.’ या कादंबरीवर आधारित विशाल भारद्वाज यांनी अजय देवगण, सैफ अली खान, विवेक ओबेरॉय, करिना कपूर, कोंकना सेन शर्मा यांच्यासह ‘ओमकारा’ चित्रपट २००६मध्ये बनवला.

हैदर (२०१४)

विशाल भारद्वाज हा असा दिग्दर्शक आहे जो चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात असतो. त्याने शाहिद कपूर, तब्बू, के. के. मेनन आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिकेत ‘हैदर’ चित्रपटाची निर्मिती २०१४ मध्ये केली. ‘हैदर’ हा चित्रपट शेक्सपियरची ट्रॅजेडी ‘हॅम्लेट’वर आधारित आहे.

७ खून माफ (२०११)

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिची डार्क कॉमेडी म्हणजे ‘७ खून माफ.’ हा चित्रपट रस्किन बाँण्ड यांची शॉर्ट स्टोरी ‘सुझान्स सेव्हन हजबंड्स’ यावर आधारित आहे. २०११मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘७ खुन माफ’ मध्ये इरफान खान, नसिरूद्दीन शाह, अन्नू कपूर, नील नितीन मुकेश, जॉन अब्राहम, विवान शाह, उषा उथ्थप हे कलाकार आहेत.

लुटेरा (२०१३)

इंग्रजी लेखक ओ.हेन्री यांची शॉर्ट स्टोरी ‘द लास्ट लीफ’वर आधारित दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांचा २०१३मध्ये प्रदर्शित झालेला रोमँटिक चित्रपट ‘लुटेरा’ आहे. यात रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा यांनी मुख्य भूमिकेत उत्तम अभिनय साकारला आहे.

पिंजर (२००३)

दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी लेखिका अमृता प्रीतम यांची पंजाबी कादंबरी ‘पिंजर’वर आधारित चित्रपट २००३ मध्ये साकारला. ऊर्मिला मातोंडकर, मनोज बाजपेयी आणि संजय सुरी यांच्या दर्जेदार अभिनयाने नटलेल्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com