सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> राष्ट्रीय >> स्टोरी
एअर हॉस्टेससोबत 'गंदी बात', प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल
First Published: 17-July-2017 : 12:45:19
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 -  विमान प्रवासादरम्यान अश्लिल इशारे करून हवाई सुंदरीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांना एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीचे नाव लग्नेश कुमार मकवाना असून तो मुंबईतील अंधेरी परिसरातील राहणारा आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 509 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  गेल्या तीन महिन्यांमध्ये विमान प्रवासादरम्यान महिलेशी गैरवर्तंन केल्याच्या तीन घटना समोर आल्या आहेत. 
या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या बँकॉकहून मुंबईत येणाऱ्या विमानात ही घटना घडली होती. हे विमान शुक्रवारी रात्री हे विमान मुंबईत दाखल झाले.  रात्री साडे दहाच्या सुमारास वैमानिकाने सर्व प्रवाशांना सीट बेल्ट बांधून घेण्यास सांगण्याची सूचना  विमानामधील कर्मचाऱ्यांना दिली. त्यनंतर प्रवाशांनी सीटबेल्ट व्यवस्थित बांधलेत की नाही याची चाचपणी पीडित महिला कर्मचारी कतर असताना आरोपी मकवाना याने घाणेरडे आवाज काढत अश्लील खाणाखुणा करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर पीडितेने याची माहिती विमानाचे कॅप्टन आणि सहकाऱ्यांना दिली. त्यानंतर नियमानुसार या घटनेची माहिती एअर ट्रॅफीक कंट्रोलला देण्यात आली. अखेर विमान मुंबईतील विमानतळावर उतरल्यानंतर सीआयएसएफने आरोपीला पकडूम पोलिसांच्या ताब्यात दिले.  

अधिक वाचा 

(अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा सिनेमागृहात विनयभंग )

(व्हॉटसअ‍ॅपवर अश्लील मेसेज पाठवून तरुणीचा विनयभंग)

(ठाण्यात अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, कराटे प्रशिक्षकाला अटक)

(VIDEO: मुंबई - चर्चगेट स्थानकावर भरदिवसा तरुणीचा विनयभंग)

याआधी महिन्याच्या सुरुवातीस एका महिला सहप्रवाशाला चुकीच्या रीतीने स्पर्श केल्याने पोलिसांनी नाशिकमधील दोन जणांना अटक केली होती. तर जूनमध्ये एका महिलेने सहप्रवाशाने आपल्याची गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. तसेच दिल्लीतून मुंबईकडे जाणाऱ्या एका विमानात महिला वकिलाला सहप्रवाशाच्या गैरवर्तनाचा सामना करावा लागला होता.  
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com