सोमवार २६ जून २०१७

Menu

होम >> राष्ट्रीय >> स्टोरी
अबब ! छप्पर फाडून घरात कोसळला हत्ती
First Published: 21-April-2017 : 14:53:57
Last Updated at: 21-April-2017 : 15:02:05
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 21 - जुमिला यांचं घर रस्त्याला लागून असल्याने त्यांना नेहमी एखादं वाहन रस्ता सोडून आपल्या घराच्या छतावर पडेल अशी भीती वाटायची. पण त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की एक हत्ती त्यांच्या घराचं छत फाडून घरात घुसेल. 
 
एक हत्ती आणि त्याचं एक वर्षाचं पिल्लू गुरुवारी जुमिला यांच्या घराजवून जात होते. त्यावेळी पिल्लाचा पाय छतामध्ये अडकला आणि आपल्या आईच्या डोळ्यांदेखत तो खाली घरात जाऊन कोसळला. 
 
घरामध्ये जुमिला आपल्या लहान बाळासोबत गाढ झोपेत होती. हत्ती कोसळल्यानंतर झालेल्या जोरदार आवाजामुळे त्यांना अचानक जाग आली. घरात अंधार असल्याने त्यांना हलक्या उजेडात हत्तीचं पिल्लू उभं असलेलं दिसलं. सुरुवातीला जुमिला यांना आपण एखादं स्वप्न पाहत आहोत असं वाटलं. पण हत्तीच्या पिल्लाने जोरजोरात आवाज करण्यास सुरुवात केल्यानंतर त्या धाडकन उठून उभ्या राहिल्या. सर्वात आधी त्यांनी आपल्या बाळाला आपल्या जवळ घेतलं आणि किचनमध्ये जाऊन लपल्या. 
 
'आजूबाजूचं अनोळखी वातावरण पाहून ते पिल्लू घाबरलं होतं. त्याला काही हलक्या जखमाही झाल्या आहेत', अशी माहिती वनअधिका-याने दिली आहे. 
 
घराचा दरवाजा बंद असल्याने हत्तीचं पिल्लू घराबाहेर पडू शकत नव्हतं. त्याची धडपड चालू होती. एकीकडे जुमिला आपल्या बाळाला वाचवण्यासाठी धावपळ करत होत्या तिथे दुसरीकडे हत्तीदेखील आपल्या पिल्लासाठी बेचैन झाली होती. आपल्या पिल्लाला कसं बाहेर काढता येईल याचा शोध ती घेत होती. शेवटी घराच्या मागचा दरवाजा तोडून तिने आपल्या पिल्लाला बाहेर काढलं. 
 
हत्ती आणि पिल्लाला पुन्हा जंगलात सोडण्यात आलं आहे. या घटनेमुळे जुमिला यांना प्रचंड धक्का बसला असून त्यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. 
 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com