मंगळवार २५ जुलै २०१७

Menu

होम >> राष्ट्रीय >> स्टोरी
झाकीरची १८.३७ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त
First Published: 21-March-2017 : 03:52:58

मुंबई : झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) व इतर संबंधितांची १८.३७ कोटी संपत्ती मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आली आहे. याव्यतिरिक्त असलेल्या अन्य मालमत्तेबाबत ईडीचा शोध सुरू केला आहे. तर दुसरीकडे एनआयएकडून झाकीर नाईकला ३० मार्चपर्यंत हजर राहण्याबाबत आदेश बजाविण्यात आले आहेत.

आयआरएफच्या नावावर ९.४१ कोटींचे म्युचुअल फंड असून पाच विविध बँक खात्यात तब्बल १.२३ कोटींची ठेवी आहेत. त्यांच्या संस्थेच्या नावावर असलेल्या चेन्नई येथील १० शाळांच्या इमारतींचा समावेशही जप्त मालमत्तेत करण्यात आला आहे. या इमारतींची किंमत ७.५ कोटी इतकी आहे. येथीलच हारमनी मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्येही ६८ लाखांची गुंतवणूक असल्याचे समोर आले. इडीने दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांचा यात समावेश असल्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com