सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> मुंबई >> स्टोरी
सोमवार, मंगळवारी मुसळधार वृष्टीची शक्यता
First Published: 17-July-2017 : 02:53:00
Last Updated at: 17-July-2017 : 09:53:10

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तब्बल तीन दिवस मनमुराद बरसलेल्या मान्सूनने, रविवारी मात्र विश्रांती घेतली. किंचित कुठे तरी बरसलेल्या पावसाच्या एक-दोन सरी वगळता, रविवारी दिवसभर मान्सूनचा शुकशुकाट होता. दरम्यान, पावसाने विश्रांती घेतली असली, तरी पडझडीच्या घटना घडल्या असून, सुदैवाने यात हानी झालेली नाही.

मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारच्या सकाळी साडेआठच्या नोंदीनुसार, शहरात २४.३५, पूर्व उपनगरात ६९.२१ आणि पश्चिम उपनगरात ४७.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरात एक, पूर्व उपनगरात दोन आणि पश्चिम उपनगरात एक अशा एकूण तीन ठिकाणी बांधकामांचा भाग पडला. शहरात सहा, पश्चिम उपनगरात एक अशा एकूण सात ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात १६, पूर्व उपनगरात १८ आणि पश्चिम उपनगरात २४ अशा एकूण ५८ ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने या दुर्घटनांत जीवितहानी झाली नाही. दरम्यान, गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनी येथील टेकडीवरील माती आणि झाडे उन्मळून, लगतच्या इमारतीच्या संरक्षक भिंतीवर पडली. यात कोणालाही मार लागला नाही. रविवारी असलेल्या काहीशा आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी मरिन ड्राइव्ह येथे नेहमीप्रमाणे तरुणाईने गर्दी केल्याचे चित्र होते. रविवारी पावसाने विश्रांती घेतली असली, तरी सोमवारसह मंगळवारी शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com