सोमवार २६ जून २०१७

Menu

होम >> मुंबई >> स्टोरी
ईडीच्या अधिका-याला सोमाटणे फाटा येथे डांबून मारहाण
First Published: 21-April-2017 : 16:19:48
ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 21 - बँकेच्या महाराष्ट्रातील चालक ते मालक घोटाळ्याच्या पुण्यातील तपासणीसाठी आलेल्या सक्तवसुली संचालनालय (ईडी)च्या अधिका-याला डांबून ठेऊन मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार सोमवारी सोमाटे फाटा (ता. मावळ, पुणे) येथील सिद्धिविनायक लॉजिस्टीक येथे दुपारी अडीच ते रात्री आठच्या सुमारास घडला. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेशकुमार योगेश गांधी (वय-34, रा. वडाळा, मुंबई ईस्ट) असे मारहाण करण्यात आलेल्या अधिका-याचे नाव असून, त्यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुजरातमधील 'चालक ते मालक' या योजने अंतर्गत एका लॉजिस्टेक्स कंपनीला 658 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. यामध्ये बँकेची फसवणूक करण्यात आली असल्याचे तपास उघडकीस आले होते. याप्रकरणी गुजरातमधून मुख्य सुत्रधाराला अटक करण्यात आली आहे. उमेशकुमार गांधी हे मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात कार्यरत आहेत. या घोटाळ्या प्रकरणी सोमाटणे फाटा येथील सिद्धीवीनायक लॉजिस्टीकच्या मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
 
सोमवारी त्यांना सोमाटणे फाटा येथील सिद्धिविनायक लॉजिस्टिक्स मधील मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. गांधी दुपारी अडीच्या सुमारास सिद्धिविनायक लॉजिस्टेक्स या ठिकाणी आले होते. त्यावेळी त्यांनी सोसायटीचे सुपरवायझर दत्ता काकडे यांच्याकडे 16 ए डी आणि सी या मालमत्ते बाबत चौकशी केली. दत्ता काकडे याने या ठिकाणी अशी कोणतीच मालमत्ता नसल्याचे सांगून त्यांना दुस-या ठिकाणी घेऊन गेला.
 
त्याठिकाणी गांधी यांना चौकशी करण्यासाठी सांगितलेल्या मालमत्ता मिळाली. त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला असता त्यांना आतमध्ये असलेल्या एका पुरुषाने घरात येण्यास सांगितले. गांधी यांनी आपण ईडी कडून आलो असल्याचे सांगून मालमत्तेची कागदपत्रे मागीतली. परंतु उपस्थित इसमाने त्यांना तू खोटा अधिकारी असल्याचे सांगून त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली.
 
तसेच त्यांना फरशीवर बसवून लाकडी दांडक्याने मारहाण केली. या इसमाने फोन करुन आणखी तीन जणांना बोलावून घेतले. त्यांनी देखील गांधी यांना मारहाण केली. रात्री आठच्या सुमारास गांधी यांनी तेथून आपली सुटाक करुन घडलेला प्रकार आपल्या वरिष्ठांना सांगितला. वरिष्ठांच्या सांगण्यावरुन गांधी यांनी पाच जणा विरुद्ध तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com