सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> महाराष्ट्र >> स्टोरी
रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
First Published: 17-July-2017 : 23:35:02
Last Updated at: 18-July-2017 : 03:41:14

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 17 : राष्ट्रीय युवक काँग्रेसचे समन्वयक रोहित टिळक यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा सोमवारी रात्री उशिरा विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणी एका वकील महिलेने फिर्याद दिली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव शेवाळे यांनी दिली़

रोहित टिळक हे काँग्रेसचे युवक नेते आणि एनएसयूआयचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी यापूर्वी २००९ मध्ये कसबा पेठेतून विधानसभा निवडणूक लढविली होती़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २०१५ ते २०१७ दरम्यान केसरीवाडा, डेक्कन जिमखाना व पुण्यातील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये घडली़ ही महिला आणि रोहित टिळक यांची एका कार्यक्रमादरम्यान २०१५ मध्ये ओळख झाली़ त्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमादरम्यान त्यांची भेट झाली़ रोहित टिळक यांनी लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले़ त्यानंतर त्यांनी वारंवार लग्नाविषयी विचारले असता टिळक यांनी लग्नास नकार दिला़ त्यानंतर त्यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांकडे धाव घेतली़ 

विश्रामबाग पोलिसांनी रोहित टिळक यांच्यावर बलात्कार, अनैसर्गिक शारीरिक संबंध, मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे अशा ३७६, ३७७, ३२३, ५०४, ५०६, ५०७ विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे़ या महिला वकील असून त्यांचा विवाह झाला आहे़ परंतु, काही वर्षांपासून त्या पतीपासून वेगळ्या राहत आहेत़ त्या कौन्सिलिंगची कामे करतात़

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com