सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> महाराष्ट्र >> स्टोरी
पुणे - मद्यधुंद पत्नीने पतीवर टाकले उकळते तेल
First Published: 17-July-2017 : 22:06:22

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 17 : सहा वर्षांपूर्वी दोघांची पुणे-मुंबई प्रवासामध्ये रेल्वेत ओळख झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. काही महिन्यांपूर्वीच कोर्टमँरेज करून त्यांनी संसाराला सुरूवात केली होती. मात्र एके दिवशी मुंबईवरून पुण्यात पत्नीला भेटायला येणे त्याला चांगलेच महागात पडले. किरकोळ वादावादीतून संतापलेल्या पत्नीने आपल्या पतीवर उकळते तेल ओतल्याची घटना वानवडी येथे घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पत्नीला अटक केली.

भरत अर्जुनराम शेरसियसा (वय २६) असे जखमी पतीचे नाव आहे. पत्नी जया भरत शेरसिया (वय ३८) हिला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत हा मुंबईला चेंबुर येथे एका मोबाईलच्या दुकानात काम करतो. जया ही पुण्यात वानवडी येथील सिक्रेट टाऊन येथे रहाते. या दोघांची २०११ मध्ये पुणे-मुंबई प्रवासामध्ये रेल्वेत ओळख होऊन त्याचे प्रेमात

रूपांतर झाल्यानंतर त्यांनी काही महिन्यांपूर्वी कोर्टमॅरेज केले. महिन्यातून एक दोन वेळेस तो पुण्यात तिला भेटायला येतो. शनिवारी तो पुण्यात आल्यानंतर रात्री त्यांनीभरपूर दारू प्यायली. गप्पा मारत बसलेले असताना त्यांच्यामध्ये अचानक वाद सुरू झाला. त्यानंतर भरत हा झोपी गेला.

परंतु, चिडलेल्या जयाने स्वयंपाक घरात जाऊन गँसवर तेल गरम करून ते उकळतेतेल त्याच्या अंगावर टाकले. शरीर भाजल्याने जोरात ओरडत भरतने शेजाच्यांना मदत मागितली, परंतु त्याला मदत मिळाली नाही. शेवटी तिच्या तावडीतून सुटका करून घेऊन घरातून बाहेर आला. रिक्षा पकडून रुग्णालयात गेला. यामध्ये भरतीची पाठ आणि पोट १० टक्के भाजले आहे. याप्रकरणी पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली. जयाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक हंचाटे करत आहेत.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com