सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> महाराष्ट्र >> स्टोरी
सामाजिक बहीष्कार प्रतिबंध या नविन कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल
First Published: 17-July-2017 : 22:02:00

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 17 : जातीबाहय विवाह केला याची शिक्षा म्हणून पुणे तेलगु मडेलवार समाजाच्या जात पंचायतीने बहिष्कृत केल्यामुळे एकाने पोलिसांकडे धाव घेतली असून, पंचायतीविरूद्ध त्याने केलेल्या तक्रारीनुसार 17 व्यक्तींवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने सामाजिक बहिष्कार प्रतिबंध या नवीन कायद्याअंतर्गत हा

पहिलाच गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

उमेश चंद्रकांत रूद्राप ( वय 51 वर्षे रा. गल्ली नं 20 शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. आजच्या घडीला जो कोणी आंतरजातीय विवाह करीत असेल त्यांच्या लग्नाला पंचमंडळी उपस्थित राहात नाहीत. जे कोणी पदाधिकारी लग्नाला हजर राहातील त्यांना पदत्याग करण्यास भाग पाडले जाते. लग्न, सत्कार समारंभाला कुणी नातेवाईक गेल्यास त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

त्यानुसार राजेंद्र नरसू म्हकाळे ( अध्यक्ष), सुनिल दत्तू कोंडगिर (उपाध्यक्ष), अनिल वरगंटे (सेक्रेटरी), श्रीधर बेलगुडे ( सहसेक्रेटरी), सुनिल वरगंटे ( खजिनदार), देवीदास वरगंटे ( सहखजिनदार), शिवन्ना आरमुर (मुख्यसंघटक) वसंत

वरगंटे (सहसंघटक), लक्ष्मण बेलगुडे ( सहसंघटक), संजय येलपुरे ( सहसंघटक), तुळशीराम तेलाकल्लू, प्रेमचंद वडपेल्ली, सुभाष कंट्रोलू ( सल्लागार), नारायण इस्ट्रोलकर ( सल्लागार), मनिषा आसरकर आणि स्वरूपा अंबेप ( महिला

प्रतिनिधी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

आम्ही आणि आमच्या पालकांनी समाजातील ज्येष्ठ, उदारमतवादी सभासदांनी पंचायतीला आम्हाला वाळीत टाकू नका. आम्हाला जातीत लग्न करणा-या मुलांसारखे सभासद करून घ्या व नात्यानात्यातला वितुष्ठ, वितंडवाद संपवून

टाका अशी त्यांना विनंती केली, परंतु त्यांना जातीच्या रूढ परंपरेची पंचाच्या फतव्याची जास्त काळजी आहे. आंतरजातीय विवाह केलेल्या आमच्यासारख्यांची सोईरीक पुन्हा जातीत होऊ नये याकरिता मुला/मुलींच्या पालकांना तोंडी आडमार्गाने सोयरिक न करण्याबददल धमकावले जाते. पंचाच्या या हट्टापायी काही पालकांनी मुला/मुलींचे लग्न त्यांच्या मनाविरूद्ध

लावून दिले परिणामस्वरूप त्यांचा संसार उध्वस्त झाला. आंतरजातीय विवाह करणे हा गुन्हा नाही. देशाच्या घटनेची व सर्वोच्च न्यायालयाची त्याला हरकत नाही. आपल्या महाराष्ट्रात आणि पुण्यात देखील जात पंचायतीच्या जाचाला कंटाळून काहींनी आत्महत्या केली आहे. काहींनी आपले प्राण घेतले आहेत असे आमच्याबाबत काही घडू नये यासाठी पंचायतीला आम्हाला विनाअट आर्थिक दंड न आकारता सभासद करून घेण्यास भाग पाडावे यांनी नकार दिल्यास नवीन सामाजिक कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व जात पंचायत बंद पाडण्यास भाग पाडावे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रूद्राप यांनी तक्रार अर्जात केली आहे.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com