सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> महाराष्ट्र >> स्टोरी
राष्ट्रपतिपद निवडणूक : छगन भुजबळ तासाभरासाठी जेलमधून सुटणार
First Published: 17-July-2017 : 11:13:39
Last Updated at: 17-July-2017 : 11:47:30

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 17 - देशातील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सकाळी 10 वाजता संसदेत मतदान केले. भाजपाच्या नेतृत्वाखाली रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचे पारडे जड मानले जात आहे.
 
दरम्यान, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मुंबईतही आमदारांचे मतदान होत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ व तर अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले रमेळ कदम यांना मतदानाची परवानगी देण्यात आली आहे. 
 
राष्ट्रपती निवडणुकीसाठी आपल्याला विधिमंडळात जाऊन मतदान करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती छगन भुजबळांनी केली होती. पीएमएलए कोर्टाकडे भुजबळांकडून ही विनंती करण्यात आली होती. भुजबळ हे नाशिकच्या येवला मतदारसंघाचे आमदार आहेत याच नात्याने ते राष्ट्रपती निवडणुकीसाठी मत देण्यास पात्र आहेत.  
 
आणखी बातम्या वाचा
(राष्ट्रपतिपद निवडणूक - पंतप्रधान मोदींनी केले मतदान)
(‘रमेश कदमला मतदानास मुभा नाही’)
(राष्ट्रपती निवडणुकीसाठी मला सोडा, छगन भुजबळांची विनंती)
 
भुजबळांच्या या मागणीवर सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) विरोध करण्यात आला होता. ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी छगन भुजबळ यांच्या विनंती अर्जाला विरोध केला होता. ईडीने आपला विरोध दर्शवताना काही प्रमुख मुद्दे मांडले होते. पीएमएलए कायद्याच्या कलम 44 नुसार अशा व्यक्तीला घटनेच्या 54 व्या कलमानुसार मिळणाऱ्या घटनात्मक अधिकाराबद्दल आदेश देण्याचा अधिकार विशेष कोर्टाला नाही आहे असा दावा ईडीकडून करण्यात आला होता.  
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com