मंगळवार २७ जून २०१७

Menu

होम >> महाराष्ट्र >> स्टोरी
VIDEO : महिलांनी कसलीही लाज बाळगू नये - विद्या बालन
First Published: 20-March-2017 : 15:39:06
Last Updated at: 20-March-2017 : 15:52:00

 ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 20 -  'लोकमत वुमन समिट 2017'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनही सहभागी झाली होती. 'शक्तिशाली बनताना कसलीही लाज बाळगू नका आणि स्वतःला दोषीही धरू नका', असं आवाहन विद्याने यावेळी महिलांना केले. 'महिलांनी स्वतःला सशक्त करताना लाज बाळगण्याची गरज नाही. कुठल्याही क्षेत्रात यशस्वीततेच्या शिखरावर पोहोचत असताना अनेकदा दोषी असल्याची भावना मनात येते. पण त्यातून स्वतःचा शोध घ्या', असा सल्लाही तिने यावेळी महिलांना दिला. 
('लोकमत वुमेन समिट'चे भव्य दिव्य उद्घाटन)
विद्या बालन पुढे असंही म्हणाली की, चित्रपटातून समाजाच्या वास्तवतेचे प्रतिबिंब उमटते, असे म्हणतात पण माझ्या मते चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम आहे, सामाजिक प्रबोधनाचे नाही, पण त्यातून नक्कीच आपण चांगले काहीतरी घेऊ शकतो.
भारताचे स्वच्छ चित्र समोर येण्यासाठी मी स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडर होणे स्वीकारले. प्रत्येकामध्ये एक बुलंद आवाज दडलेला आहे मात्र तो बाहेर आणण्यास आपण घाबरतो, सामान्यांचे कुणी ऐकत नसेल पण माझे कुणी ऐकणार असेल तर मी नक्कीच बदल घडवून शकेन, असंही मत तिनं यावेळी मांडलं. 
 
(प्रत्येक मुलीने व्हावे धाकड, लोकमत वुमन समिटमध्ये गीता फोगटचे आवाहन)
 
 

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com