सोमवार १ मे २०१७

Menu

होम >> राशी भविष्य >>
आठवड्याच्या सुरुवातीलाच लक्ष्मीचा वरदहस्त लाभल्यामुळे आपण आनंदात राहाल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. कुटुंबात शुभकार्य घडल्यामुळे मनाला आनंद मिळेल. जोडधंद्यातून तसेच गृहउद्योगातून चांगली अर्थप्राप्ती होईल. कुटुंबासाठी खर्च कराल. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी निव़ड झाल्यामुळे परगावी जाण्याचे योग येतील. समाजात आपली लोकप्रियता वाढेल. थोरा-मोठ्यांच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. अनपेक्षितपणे आप्तस्वकियांच्या गाठीभेटी आनंद मिळवाल. सुग्रास भोजनाचे योग येतील. परदेशस्थ भावंडांशी संपर्क साधाल. भरपूर काम करायचे आणि गृहसौख्याचा आस्वाद घ्यावयाचा असे मनोमन ठरवाल. पाहुण्यांची सतत वर्दळ राहील. शुभदिनांक २,३

 
वर
होम | ताज्या बातम्या | मुख्य वेबसाइट
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com